Team My Pune City – यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav)अधिक भव्य आणि मोठ्या प्रमाणावर साजरा होणार असून, राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिल्यानंतर पुणे शहरात तयारीला वेग आला आहे. 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या उत्सवासाठी पोलीस प्रशासन, मंडळे आणि स्थानिक यंत्रणा सर्व स्तरावर सज्ज होत आहेत. पुण्याचा गणेशोत्सव जगप्रसिद्ध असून, यंदा लाखो भाविकांसह देश-विदेशातून पर्यटकही पुण्यात दाखल होणार आहेत.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, “गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे सुरक्षा आणि व्यवस्थापनाची जबाबदारी अधिक मोठी झाली आहे. नागरिक आणि भाविकांना सुरक्षित, सुखकर आणि आनंददायी वातावरणात उत्सव अनुभवता यावा यासाठी सर्वतोपरी तयारी केली जात आहे,” असे त्यांनी नमूद केले.
Nutan Maharashtra Engineering : आधुनिक उद्योगांवर आर्टिफिशियल इंटेलिजंसचा सकारात्मक परिणाम – डॉ. दीपक शिकारपूर
Adkar Foundation : पंढरीच्या वारीमुळे मराठी भाषा टिकून – डॉ. सदानंद मोरे
याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी आयुक्त कुमार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह शहरातील महत्त्वाच्या गणेश मंडळांची पाहणी केली. पाहणीदरम्यान गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था, तसेच आपत्कालीन प्रतिसाद योजना या सर्व घटकांचा आढावा घेण्यात आला. शहरातील प्रमुख मंडळांमध्ये होणाऱ्या दर्शन रांगा आणि मिरवणुकीदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
यंदाच्या गणेशोत्सवात पुणेकरांसह बाहेरगावच्या भाविकांना सुरक्षिततेसोबतच सुरळीत व्यवस्था अनुभवता यावी, यासाठी पोलिसांनी विशेष सुरक्षा बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण, तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने कारवाई करण्याची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. पुणे शहर गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.