Team My Pune City – श्रीगणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान महावितरणचे (Ganeshotsav) सर्व अभियंता व तांत्रिक कर्मचारी ‘ऑन ड्यूटी’ होते. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठा व वीजसुरक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा न येता गणेशोत्सवाच्या आनंदपर्वाची निर्विघ्नपणे सांगता झाली.
आनंदपर्व असलेला गणेशोत्सव यावर्षी राज्योत्सव म्हणून साजरा झाला. या उत्सवात सुरळीत वीजपुरवठा व वीज सुरक्षेसाठी महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच मुळशी, वेल्हे, हवेली, आंबेगाव, जुन्नर, खेड व मावळ तालुक्यांमधील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. शनिवार (दि. 6) विविध ठिकाणी विसर्जन मिरवणुकींना सुरवात झाली. महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार, प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी मोठ्या मंडळांच्या व मिरवणुकीतील गणेशमूर्तींचे विसर्जन पूर्ण होईपर्यंत सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधित कर्मचाऱ्यांनी पूर्णवेळ ‘ऑन ड्यूटी’ राहण्याचे तसेच प्रत्येक तासाला वीजपुरवठ्याची स्थिती व इतर माहिती अपडेट करण्याचे निर्देश दिले होते.
Nana Peth Crime News : कोमकरचा खून प्रकरणी बंडू आंदेकरसह अकरा जणांवर गुन्हा
Jambhavede: गणेशोत्सवात महिलांसाठी खास आकर्षण – “खेळ रंगला पैठणीचा”!
तसेच संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार स्वतः पुणे शहरातील विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यांच्यासह अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते, उपविभाग व शाखा अभियंते तसेच तांत्रिक नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचारी आपापल्या कार्यक्षेत्रातील मिरवणूक मार्ग व विसर्जन घाटावर सज्ज होते. सुरळीत वीजपुरवठ्यासह प्रामुख्याने वीजसुरक्षेसाठी अविश्रांत कर्तव्य बजावत होते. पुणे शहरातील महत्त्वाच्या लक्ष्मी रोड व टिळक रोडवरील विसर्जन मिरवणुकीसाठी लक्ष्मी रस्त्यावर तात्पुरता नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला. या कक्षातून इतर सर्व सरकारी यंत्रणेशी समन्वय साधण्यात येत होता. वीज पुरवठा व सुरक्षेच्या दृष्टीने गणेशोत्सवाची निर्धोक सांगता झाली.