जिद्द असेल तर असाध्य हे साध्य करता येते – तहसीलदार अजित गायकवाड
Team My pune city –’आम्ही मुळशीकर’ प्रतिष्ठानच्यावतीने १९ वा(Ganesh Satpute) “शाब्बास” गुणगौरव सोहळ्याचे आयोजन कोथरूड येथील उत्सव मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी २५० हून अधिक १० वी, १२ वीतील यशवंत विद्यार्थांना शालेय उपयोगी वस्तू तसेच सन्मानचिन्ह देवून त्यांना गौरविण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार अजित गायकवाड, उल्हे कोचिंग क्लासचे संचालक मनोज उल्हे, महेश महाले, कार्यक्रमाचे संयोजक ॲड. गणेश सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले, की अशा कार्यक्रमातून प्रोत्साहन मिळते आणि यातूनच पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. जिद्द असेल तर असाध्य हे साध्य करता येते. ग्रामीण भागातून येवून स्पर्धा परीक्षांमध्ये अभ्यास करून पुढे येणे खूप कठीण आहे. मात्र जिद्दीने पुढे आले पाहिजे. १० वी १२ नंतर जीवनातील सर्वात महत्त्वाचे वळण आहे. येथून आपण विविध शाखेत प्रवेश घेऊ स्वतःचे भवितव्य घडवू शकता. ते पुढे म्हणाले की अशा वेळी पालकांनी मुलांचा कल कुठे आहे हे ओळखून मुलांच्या पाठीशी खंबीर उभे रहावे.

सातपुते म्हणाले, की “गेल्या १९ वर्षांपासून “आम्ही मूळशीकर प्रतिष्ठान”च्या माध्यमातून सातत्याने काम करत आहेत. यामध्ये उद्योजकांचा सन्मान, नोकरी महोत्सव, वधुवर मेळावा, गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार, आम्ही मूळशीकर भूषण पुरस्कार असे अनेक उपक्रम गेल्या दोन दशकांपासून आम्ही राबवत आहेत. मुळशी तालुक्यातील नाणेगावचे सुपुत्र गायकवाड हे सध्या तहसीलदार म्हणून कराड येथे कार्यरत आहेत. तेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी उपस्थिती लावली. मुळशी तालुक्यासाठी नेहमी चांगले कार्य करण्याची माझी तळमळ आहे. स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही. नेहमी विद्यार्थ्यांनी संघर्षाची तयारी ठेवावी.
Tamhini Ghat murder : व्यसनाधीन भावानेच केला भावाचा खून
Talegaon Dabhade: कै. डॉ. जयंत नारळीकर स्मृती विज्ञान लेखन पुरस्कार सोहळा संपन्न
उल्हे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास डोक यांनी केले. तर सूत्रसंचालन बंडू दातीर यांनी केले आणि आभार राजेंद्र उभे यांनी मानले. तर निवृत्ती येवळे, अनंतराव दहीभाते, सीताराम तोंडे पाटील, माऊली डफळ, सुरेश साळुंखे, लक्ष्मण कंधारे, विकास डोख, सदाशिव तापकीर, रमेश उभे, सुरेश शिंदे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
विशेष सन्मानाने यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक
यावेळी विशेष सन्मान करून यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. त्यामध्ये डॉ. देविका माझीरे, सी.ए. प्रज्वल वाईकर, उम्री नांगरे, संस्कृती तापकीर, प्रथमेश टमगिरे अर्जुन मारणे, आयुष्य दहीभाते, अर्जुन खैरे आदींचा सन्मान करण्यात आला.