Team My Pune City : आंदेकर आणि कोमकर टोळ्यांतील जुना वैर पुन्हा एकदा पेटला असून, या टोळी युद्धात गणेश काळे (रा. पुणे) याचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. (Ganesh Kale Murder) ही धक्कादायक घटना शनिवारी (ता. १) दुपारी कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकाजवळील पेट्रोल पंपासमोर घडली. या खुनानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याचे समजते.
Chakan police On Action:चाकण पोलिसांची धडक कारवाई – वीस मद्यपींना अटक
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश काळे हा कोंढवा भागातील पेट्रोल पंपाजवळून रिक्षा घेऊन जात असताना दोन दुचाकींवरून आलेल्या चौघा हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या (Ganesh Kale Murder) आणि कोयत्याने वार करून त्याला जागीच ठार केले. हल्ल्यानंतर आरोपी वेगाने घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
गणेश काळे हा वनराज आंदेकर हत्येच्या प्रकरणातील मुख्य आरोपी समीर काळेचा भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वनराज आंदेकर, जो राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक होता, त्याचा १ सप्टेंबर २०२४ रोजी गणेश कोमकर टोळीतील गुंडांनी गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून केला होता. (Ganesh Kale Murder) त्यानंतर काही महिन्यांनी आंदेकर टोळीने प्रत्युत्तरादाखल गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याचा गोळ्या झाडून खून केला होता. या दोन्ही घटनांनंतर दोन्ही टोळ्यांतील अनेकांना अटक करण्यात आली होती. परंतु वर्षभरानंतर पुन्हा दोन्ही टोळ्यांमध्ये वैराचा भडका उडाल्याने शहरात तणाव निर्माण झाला आहे.
Vadgaon Maval News : यशवंतनगर ते कातवी रस्त्याची दुरावस्था
वनराज आंदेकरच्या हत्येत वापरलेली पिस्तुले समीर काळे याने मध्यप्रदेशातून आणली होती. तो सध्या तुरुंगात शिक्षा भोगत (Ganesh Kale Murder) असताना त्याचा भाऊ गणेश काळे याचा आज खून करण्यात आला.
या खुनानंतर आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी शहरातील आणि उपनगरातील विविध भागात शोधमोहीम हाती घेतली. (Ganesh Kale Murder) सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी साताऱ्याकडे पळ काढणाऱ्या चार संशयितांचा माग काढला. अखेर खेड शिवापूर टोल नाक्याजवळ अमन शेख, अरबाज पटेल आणि दोन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या घटनेमुळे आंदेकर आणि कोमकर टोळ्यांतील वैर पुन्हा उफाळून आले असून, पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस






















