situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Gandhipeth Women’s Council : गांधीपेठ महिला मंडळात गणेश अथर्वशीर्ष पठण;  महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

Published On:
Gandhipeth Mahila Mandal

Team My Pune City – भाद्रपद शुद्ध पंचमी अर्थात ऋषिपंचमी, शेगावचे संत श्री गजानन महाराजांची पुण्यतिथी आणि कलावतीदेवी यांची जयंती या मंगल दिनांचे (Gandhipeth Mahila Mandal)औचित्य साधून गांधीपेठ महिला मंडळात सामूहिक अथर्वशीर्ष पठण मंगलमय वातावरणात पार पडले. दोन गुरूंना वंदन करून व श्री गणरायाच्या चरणी भक्तिभावाने अर्पण करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महिला मंडळाच्या सुमारे पन्नास सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

Pune Ganeshotsav : पुण्यात दीड दिवसांच्या 2 हजार 100 गणेशमूर्तींचे विसर्जन; दोन हजार किलो निर्माल्य संकलित

पठणाची सुरुवात कस्तुरी जमखंडी आणि प्रभावती इंदलकर यांनी केली. गणपतीसाठी शंखवादन सेवा तसेच अथर्वशीर्ष आरतीचा मान सविता दुमडे आणि प्रांजली पानसे (Gandhipeth Mahila Mandal) यांनी सांभाळला. कार्यक्रमादरम्यान वातावरणात एक वेगळाच आध्यात्मिक व भक्तिमय उत्साह पसरला होता.

या सोहळ्यात माया थोरात, शैला जमखंडी, रेश्मा जमदाडे, अश्विनी थोरात, कविता गोलांडे, सुजाता गोलांडे, चंद्रकला शेडगे, रत्नमाला बोरकर, मंगल नेवाळे, सिद्धी नेवाळे, हेमा सायकर, मंदाकिनी चोपडे आदी महिला सहभागी झाल्या. महिला मंडळाच्या अध्यक्षा गीतल गोलांडे (Gandhipeth Mahila Mandal) यांच्यासह गांधीपेठ महिला मंडळाच्या अन्य पदाधिकारी व सदस्य यांची उपस्थिती लक्षणीय होती.

Dehu Road Cantonment : देहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक

पठणाचा समारोप आरतीने झाला. त्यानंतर सर्वांनी एकमुखाने “गणपती बाप्पा मोरया”चा गजर करत श्रद्धा व भक्तीचे वातावरण अधिकच ( Gandhipeth Mahila Mandal ) उजळवले.

Follow Us On