Team My Pune City – राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था ( FTII)(एफटीआयआय) च्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झाल्याचा आरोप विद्यार्थी संघटनेने केला आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा ठपका ठेवत, प्रवेश प्रक्रिया तत्काळ स्थगित न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
Adv. Satish Gorde : नशामुक्त भारत ही काळाची गरज- ॲड. सतिश गोरडे
‘एफटीआयआय’ विद्यार्थी संघटनेच्या वतीने विकुल शुक्ला, अनुश्रीता चक्रवर्ती, अजमल शाह, अजयराज पी. आणि सौम्यदीप मंडल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “१७ ऑक्टोबरला जाहीर झालेल्या अंतिम गुणवत्ता यादीत आरक्षण धोरणाचे उल्लंघन झाले होते. विद्यार्थ्यांनी ही बाब निदर्शनास आणल्यानंतर प्रशासनाने ‘लिपिकीय त्रुटी’ मान्य करून २४ ऑक्टोबर रोजी सुधारित यादी जाहीर केली. मात्र, या यादीतही अनेक त्रुटी कायम आहेत.”
Jain Boarding Land Case : महत्वाची बातमी …जैन बोर्डिंग जमीन प्रकरणातून गोखले बिल्डर्सनी अखेर घेतली माघार
विद्यार्थ्यांच्या मते, ‘स्क्रीन अॅक्टिंग’ या अभ्यासक्रमातील जागा १६ वरून २३ करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे आरक्षणाचे प्रमाण बिघडले आहे आणि अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव जागा कमी झाल्या आहेत. तसेच प्रशासनाने प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता न ठेवता आवश्यक गुण, श्रेणी व आरक्षण वर्गवारी जाहीर केलेली नाही. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील गुणांचा तपशीलही लपवण्यात आला आहे.
याशिवाय ‘सीट प्रेफरन्स’चा पर्याय सुरुवातीलाच निवडण्याची सक्ती केल्याने अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. “एफटीआयआयच्या प्रवेश प्रक्रियेवर विश्वास उरलेला नाही,” असे संघटनेचे म्हणणे ( FTII) आहे.
दरम्यान, एफटीआयआय प्रशासनाने विद्यार्थ्यांना सोमवारी (२७ ऑक्टोबर) चर्चेसाठी बोलावले असून, लवकरच अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या :
- प्रवेश प्रक्रिया तत्काळ स्थगित करावी.
- पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे गुण व निकाल जाहीर करावेत.
- प्रवेश प्रक्रियेची चौकशी बाह्य समितीकडून व्हावी.
- विद्यार्थी प्रतिनिधींना प्रशासकीय मंडळात स्थान द्यावे. ( FTII)


















