देशभरातील ३० गुंतवणूकदारांची सुमारे पाच कोटी रुपयांनी फसवणूक; सायबर पोलिसांची मोठी कामगिरी
Team My pune city – पिंपरी-चिंचवड सायबर ( Fraud ) पोलीस ठाण्याने दोन महिन्यांच्या तांत्रिक व गुप्त तपासानंतर शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून १.०७ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीस ओडिशा येथून अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव रंजन कुमार निरंजन साहु (वय ४०, रा. कटक, ओडिशा) असे आहे. यापूर्वी या प्रकरणी विक्रोळी (मुंबई) येथून गणेश महादेव लोखंडे यासही अटक करण्यात आली होती. प्राथमिक तपासात आरोपीने देशभरातील ३० नागरिकांची एकूण ₹५,०१,२९,६४५/- (पाच कोटी एक लाख) रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
Alandi : पर्यावरणपूरक सण साजरे करणे ही काळाची गरज- माधव खांडेकर
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे खासगी नोकरी करणारे असून त्यांनी सोशल मिडियावर ‘Ventura Trading’ नावाच्या शेअर ट्रेडिंगसंदर्भातील जाहीरातीवर क्लिक केल्यानंतर त्यांना संबंधित व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले. या ग्रुपमध्ये IPO आणि स्टॉक ट्रेडिंगसंदर्भात भरघोस परतावा (१० ते ५०%) मिळेल असे सांगण्यात आले. अन्य गुंतवणूकदारांनीही गटात “नफ्याचे” स्क्रीनशॉट शेअर केल्यामुळे फिर्यादी यांनीही गुंतवणुकीचा निर्णय घेतला. या नंतर फिर्यादी यांना एक अॅप डाऊनलोड करण्यास ( Fraud ) सांगितले गेले, ज्यावर नोंदणी करून त्यांनी टप्प्याटप्प्याने एकूण १.०७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
थोड्याच दिवसांत अॅपवर ३.४० कोटी रुपये नफा दाखवण्यात आला. मात्र पैसे काढण्याचा प्रयत्न करताच विविध चार्जेस सांगून टाळाटाळ केली गेली. त्यामुळे फसवणुकीचा संशय बळावल्याने फिर्यादीने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या घटनेवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेतली असून, तपासासाठी निरीक्षक रविकिरण नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे आणि वैभव पाटील यांचे पथक तयार करण्यात आले.
Alandi : पर्यावरणपूरक सण साजरे करणे ही काळाची गरज- माधव खांडेकर
तांत्रिक तपास व आरोपींपर्यंत पोहोच
तपासादरम्यान आरोपीने वापरलेल्या आयडीएफसी बँक खात्यामध्ये ६९.७५ लाख रुपये जमा झाल्याचे निष्पन्न झाले. हे खाते ‘गिफ्टिंग प्लांट’ नावाने विक्रोळी, मुंबई ( Fraud ) येथे नोंदवले गेले होते. स्थानिक पोलीस ठाण्याच्या मदतीने गणेश लोखंडे याला अटक करण्यात आली. त्याच्याकडील चौकशीत त्याने रंजन साहु व रमेश परमार या सहकाऱ्यांच्या मदतीने कोलकाता येथे रक्कम वळवली असल्याचे सांगितले. सायबर पथकाने रंजन साहु याचा सखोल तांत्रिक तपास केला असता तो सातत्याने पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम आदी राज्यांमध्ये फिरत असल्याचे आढळले. दोन महिन्यांच्या गुप्त पाहणी व मोबाईल ट्रॅकिंगनंतर पोउपनिरीक्षक प्रकाश कातकाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कटक, ओडिशा येथे जाऊन दिनांक २८ जुलै रोजी साहु याला अटक केली.
पोलिसांकडून इशारा
सायबर पोलिसांनी नागरिकांना सोशल मिडियावर शेअर ट्रेडिंग, IPO किंवा गुंतवणुकीचे आमिष दाखवणाऱ्या जाहिरातींपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही गुंतवणूक करताना त्यामागील स्त्रोताची खातरजमा करावी आणि अनधिकृत अॅप्सपासून सावध ( Fraud ) राहावे.