Team My Pune City – हडपसर परिसरात राहणाऱ्या ( Fraud) आयटी क्षेत्रातील एका ५२ वर्षीय टीम लीडरला ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या आमिषाला बळी पडून तब्बल ३ कोटी ६६ लाख रुपयांचा फटका बसल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. ही फसवणूक १५ जुलै ते १ ऑक्टोबर या कालावधीत झाली असून, या प्रकाराने सोशल मीडियावर वाढत्या हाय रिटर्न इन्व्हेस्टमेंट फसवणुकींचा धोका अधोरेखित केला आहे.
Leopard Attack : पिंपळखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
या प्रकरणी पीडित आयटी व्यावसायिकाने शनिवारी पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्ती सोशल ( Fraud) मीडियावर ब्राउझ करत असताना एका ऑनलाइन शेअर ट्रेडिंगशी संबंधित लिंकवर क्लिक केले. त्या लिंकवरून त्याचा मोबाईल नंबर एका मेसेजिंग ग्रुपमध्ये अॅड करण्यात आला. त्या ग्रुपमध्ये उच्च परतावा मिळणाऱ्या शेअर्सबाबत चर्चा आणि आकर्षक संदेश पाठवले जात होते. या संदेशांवर विश्वास ठेवून तक्रारदाराने ग्रुप अॅडमिनशी संपर्क साधला.
Adhale Budruk: आढले बुद्रुक येथे ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा मृत्यू
अॅडमिनने त्याला एक अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक दिली. हे अॅप प्रत्यक्षात स्क्रीन मॅनिप्युलेटेड टूल होते, जे फसवणूक करणाऱ्यांच्या ताब्यातून नियंत्रित केले जात होते. सुरुवातीला तक्रारदाराने लहान रकमेची गुंतवणूक केली. काही दिवसांनी अॅडमिनने त्याला मोठ्या शेअर्स आणि आयपीओमध्ये गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले आणि सहा वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यास सांगितले. अॅपवर खोट्या नफ्याचे आकडे दाखवून त्याचा विश्वास संपादन करण्यात आला. मात्र, नंतर नफा काढण्याचा प्रयत्न करताच व्यवहार थांबवून अधिक पैसे मागण्यास सुरुवात केली, तेव्हा तक्रारदाराला फसवणुकीचा संशय आला.
या घटनेनंतर तक्रारदाराने तत्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे (पुणे सायबर पोलीस) यांनी सांगितले की, “या प्रकरणात गुंतवणूकदारांना मोठा परतावा दाखवून फसवले जाते. सोशल मीडियावरून सुरू होणाऱ्या या फसवणुकींचा विस्तार ( Fraud) अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे.”