Team My Pune City – ट्रेडिंग कंपनीचे प्रतिनिधी ( Fraud) असल्याचे भासवून एका 41 वर्षीय महिलेला तब्बल 5 लाख 33 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना सिंहगड रोड परिसरात उघडकीस आली आहे.
तक्रारीनुसार, दि. 5 जुलै ते दि. 8 जुलै 2025 या कालावधीत ( Fraud) फिर्यादी यांना मोबाईलवरून व ऑनलाईन माध्यमातून संपर्क साधण्यात आला. आरोपींनी स्वतःला ट्रेडिंग कंपनीचे प्रतिनिधी म्हणून ओळख करून दिले. “ट्रेडिंग टास्क” केल्यास अतिरिक्त कमाई होईल, असा लालूच दाखवून त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
Theft : सोमवार पेठेत गाडी चालकाची दिशाभूल करून चोरी
वेळोवेळी विविध बँक खात्यांवर पैसे पाठविण्यास भाग पाडण्यात आले. काही दिवसांनी आरोपींनी संपर्क तोडला. त्यानंतर फिर्यादी यांची एकूण 5 लाख 33 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला ( Fraud) आहे.