Team My Pune City – वाघोली परिसरात राहणाऱ्या 72 वर्षीय इसमाची तब्बल दोन लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक ( Fraud) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाईलवरील ओटीपीचा गैरवापर करून ही फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी फिर्यादी (वय 72 वर्षे, रा. वाघोली) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार( Fraud) असून त्याचा शोध सुरू आहे.
Sunil Shelke : जनसंवाद अभियानांतर्गत ग्रामस्थांच्या समस्या ऐकून उपाययोजना सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत फिर्यादींच्या मोबाईलवर फोन आला. त्यावेळी ‘एसबीआय योनो अॅप बंद पडले असून ते सुरु करण्यासाठी ओटीपी सांगावा लागेल’ असे सांगण्यात आले. विश्वास बसवून फिर्यादींना मोबाईलवर आलेला ओटीपी सांगण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून थेट दोन लाख रुपये काढले गेले. या वरून वाघोली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू ( Fraud) आहे.