Team My Pune City – एका अज्ञात व्यक्तीने ( Fraud) व्हॉट्सॲपवर खोटे मेसेज पाठवून एका 62 वर्षीय व्यक्तीची 15 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना 9 जुलै ते 23 जुलै 2025 दरम्यान संभाजी नगर, चिंचवड येथे घडली.
Nana Kate : नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
या प्रकरणात एका पुरुष फिर्यादीने (62, संभाजी नगर, चिंचवड) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनील कुमार नावाच्या व्यक्तीच्या तसेच एका बँक खात्याच्या धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली ( Fraud) नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींना त्यांच्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपवरुन मेसेज आला की, त्यांना फ्यूचर जनरली लाइफ इन्शुरन्स (FGLI) कंपनीचा दुसरा हप्ता भरण्यासाठी HDFC बँकेच्या एका विशिष्ट खात्यात पैसे RTGS द्वारे पाठवावे लागतील. आरोपीने खोटे मेसेज पाठवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीने त्यांच्या बँक खात्यातून एकूण 15 लेख 33 हजार 750 रुपये दोन टप्प्यात RTGS करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी निगडी पोलीस ( Fraud) तपास करत आहेत.