Team My Pune City – जमिनीच्या वादातून एकाने ( Firing) चुलत भावावर गोळीबार केल्याची घटना नगर रस्त्यावरील केसनंद परिसरात गुरुवारी रात्री घडली. गोळीबारात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचाा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Death of youth : जिममध्ये व्यायाम करत असताना 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू, चिंचवड येथील घटना
सुशील संभाजी ढोरे (वय 42 वर्षे, रा. ढोरेवस्ती, केसनंद, नगर रस्ता) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीचा वाद सोडविण्यासाठी सुशील हा त्यांच्या चुलत भावाबरोबर वाडेबोल्हाई परिसरात गुरुवारी रात्री ( Firing) गेला होता.
वादात सुशीलने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याने आरोपी त्याच्यावर चिडला. आरोपीकडे देशी बनावटीचे पिस्तूल होते. वादातून त्याने त्याच्याकडील बेकायदा बाळगलेल्या पिस्तुलातून सुशीलवर गोळीबार केली. पिस्तुलातून सुटलेली गोळी छातीत शिरल्याने तो गंभीर जखमी झाला. गोळीबाराची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी घटनास्थळी भेट ( Firing) दिली.
आरोपीकडून बेकायदा बाळगलेले देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीने बेकायदा बाळगलेले पिस्तूल कोणाकडून आणले ? यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार ( Firing) यांनी दिली.