परवानाधारक दुकानदारांना विक्रीसाठी वेळेचे बंधन नाही
Team My Pune City – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील ( Firecracker sale ) परवानाधारक फटाका विक्रेत्यांना ११ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर या कालावधीत २४ तास दुकाने आणि स्टॉल सुरू ठेवण्याची परवानगी पोलिस प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे पुणेकरांना दिवाळीच्या काळात कोणत्याही वेळी फटाके खरेदी करता येणार आहेत.
हा निर्णय राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या १ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या परिपत्रकाच्या अनुषंगाने घेण्यात आला आहे. दरवर्षी पुणे महापालिका, नगरपरिषदा, छावणी मंडळ तसेच ग्रामीण भागांमध्ये तात्पुरत्या स्टॉलद्वारे मोठ्या प्रमाणात फटाक्यांची विक्री ( Firecracker sale ) केली जाते.
Rashi Bhavishya 14 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?
या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व परिमंडळांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पोलिस ठाण्यांना आवश्यक सूचना द्याव्यात, जेणेकरून परवानाधारक विक्रेत्यांना अनावश्यक त्रास होणार नाही, अशी खबरदारी घेण्याचे निर्देश पोलिस उपायुक्त (मुख्यालय) राजलक्ष्मी शिवणकर यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे दिवाळीच्या रात्री उशिरापर्यंतही फटाके खरेदी करण्याची सुविधा पुणेकरांना उपलब्ध ( Firecracker sale ) होणार आहे.