सहकारी अधिकाऱ्यासह उपनिबंधकांवर गुन्हा दाखल (ACB Pune Trap)
Team MyPuneCity – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दापोडी येथे उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात मोठी कारवाई केली. नवीन सोसायटीच्या नोंदणीसाठी लाच मागणाऱ्या दोन लोकसेवकांना एसीबीने (ACB Pune Trap) रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी (२७ जून) करण्यात आली.
दापोडी उपनिबंधक कार्यालयातील सहकारी अधिकारी संगीता सुभद्रा बाबराव किरवले चौधरी (५०) असे रंगेहाथ पकडलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्यासह उपनिबंधक मुकुंद विमल भास्कर पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३३ वर्षीय व्यक्तीने एसीबी कडे तक्रार केली आहे.
एसीबीने दिलेल्या (ACB Pune Trap) माहितीनुसार, यातील तक्रारदाराने आपल्या नवीन सोसायटीच्या रजिस्ट्रेशनसाठी २५ मार्च २०२५ रोजी उपनिबंधक सहकारी संस्था, दापोडी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. त्यावेळी सहकारी अधिकारी किरवले-चौधरी यांनी सोसायटीच्या एका सभासदासाठी ७०० रुपये प्रमाणे १६ सभासदांचे एकूण ११ हजार २०० रुपयांची लाच मागणी केली होती. यापैकी ७ हजार ५०० रुपये तक्रारदाराकडून अगोदरच घेण्यात आले होते आणि सोसायटीचे नोंदणी प्रमाणपत्र तक्रारदारास देण्यात आले होते.
PMRDA : हिंजवडीमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पीएमआरडीए कडून हालचाली
मात्र, त्यांनी मागितलेली संपूर्ण लाच रक्कम न मिळाल्याने तक्रारदाराला सोसायटीचे बायलॉज (उपविधी) बुकलेट दिले नव्हते. जेव्हा तक्रारदार हे बायलॉज घेण्यासाठी किरवले-चौधरी यांच्याकडे गेले, तेव्हा त्यांनी उर्वरित ३ हजार ७०० रुपयांची लाच (ACB Pune Trap) मागितली. या प्रकारानंतर तक्रारदाराने २६ जून रोजी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे तक्रार दाखल केली.
प्राप्त तक्रारीच्या आधारे एसीबीने २६ जून रोजी पंचासमक्ष पडताळणी केली. या पडताळणीत संगीता किरवले-चौधरी यांनी ११ हजार २०० रुपये लाच मागितल्याचे आणि त्यातील ७ हजार ५०० रुपये घेऊन उर्वरित ३ हजार ७०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. लोकसेवक उपनिबंधक मुकुंद विमल भास्कर पवार यांनीही किरवले-चौधरी यांना लाच मागणीसाठी प्रोत्साहन दिल्याचे समोर आले.
शुक्रवारी (२७ जून) एसीबीने दापोडी येथील उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात सापळा (ACB Pune Trap) रचला. या सापळा कारवाईत संगीता सुभद्रा बाबराव किरवले चौधरी यांनी तक्रारदाराकडून ३ हजार ७०० रुपयांची लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली असता, त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.