situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Express Way Accident : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात : पंक्चर काढत असलेल्या दोघांना भरधाव मिक्सरने उडवलं; जागीच मृत्यू

Published On:

Team MyPuneCity – पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर ताजे गावाच्या हद्दीत शनिवारी (३१ मे) पहाटे भीषण अपघात (Express Way Accident) झाला. पिकअप वाहनाचे चाक पंक्चर झाल्याने रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या दोन तरुणांना भरधाव सिमेंट मिक्सरने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांची नावे अजय कन्हैयालाल यादव (वय २५, रा. मुंबई) आणि अफजल मुर्तुजा खान (वय ३९, रा. बजुरामपूर, उत्तर प्रदेश) अशी आहेत. या अपघाताची (Express Way Accident) माहिती राकेश कुमार नेत प्रसाद यादव (वय ३१, रा. इंदिरानगर, मुंबई, मूळ रा. रतनपूर, जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात दिली.

Pune Drunk & Drive Case : मद्यधुंद चालकाच्या कारने १२ जणांना उडवलं; उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राकेश यादव हे त्यांच्या पिकअप वाहनाने (क्रमांक एमएच ०१ डीआर ७५६७) मुंबईच्या दिशेने जात होते. ताजे गावाच्या हद्दीत एक्सप्रेस वेवरील किलोमीटर ६७/७०० या ठिकाणी (Express Way Accident) त्यांच्या वाहनाचे चाक पंक्चर झाले. त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला सुरक्षितरित्या उभे केले. त्यानंतर अजय यादव व अफजल खान हे दोघे मिळून पंक्चर काढण्याचे काम करत होते.

Ajit Pawar NCP: अजित पवारांना मोठा धक्का! नागालँडमधील 7 आमदारांनी सोडली साथ, आमदारांवर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू

त्याचवेळी सिमेंट मिक्सर वाहन (क्रमांक एमएच ४६ बीयू ५६९७) भरधाव वेगाने येऊन थेट पिकअपला धडकले. या धडकेत अजय आणि अफजल हे दोघे मिक्सरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात पिकअप वाहनाचेही मोठे नुकसान झाले.

अपघात घडल्यानंतर (Express Way Accident) मिक्सरचा चालक राजेश यादव (वय ३०, रा. बेहरा, आजमगढ, उत्तर प्रदेश) हा कोणतीही माहिती न देता व वैद्यकीय मदत न घेता घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या आणि मोटार वाहन कायद्यातील विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पोवार हे करीत आहेत.

पुण्यात मद्यधुंद कारचालकाने उडवल्याने बारा विद्यार्थी जखमी.पहा सीसीटीव्ही फुटेज

Follow Us On