Team My pune city – हिंजवडी फेज १ येथील अॅटलास कॉप्को जेसिया कंपनीच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत २३ वर्षीय तरुण ( Engineer’s suicide) अभियंत्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (२८ जुलै) दुपारी समोर आली आहे.
Pimpri Chinchwad Crime News 28 July 2025 : बावधन येथे भरधाव वेगामुळे दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू
मृत तरुणाची ओळख पियुष कवडे (२३) अशी असून तो वाकड येथे राहत होता. पियुष हा मूळचा नाशिकचा रहिवासी होता. तो गेल्या एका वर्षापासून संबंधित कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होता.
हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी पोलिसांना सुसाइड नोट आढळून आली आहे. त्यावरून ही आत्महत्येची बाब असल्याचा संशय आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात ( Engineer’s suicide) आली आहे.
Annabhau Sathe Award : “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार” डॉ. शेटीया माय – लेकीला जाहीर
कंपनीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पियुष सोमवारी एका मिटिंगमध्ये सहभागी झाला होता. दरम्यान, त्याला अचानक भावनिक धक्का बसला व तो छातीत दुखत असल्याचे कारण देत मिटिंगमधून बाहेर पडला. त्यानंतर काही क्षणांतच त्याने सातव्या मजल्यावरून खाली उडी घेतली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करत ( Engineer’s suicide) आहेत.