Team My Pune City –सर्वोच्च न्यायालयाच्या ( Elections) आदेशानुसार, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने तयारीचा वेग वाढवला आहे. आज, मंगळवारी सायंकाळी चार वाजता राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे पत्रकार परिषद घेणार असून, या परिषदेत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू होण्याचीही शक्यता वर्तवली जात ( Elections) आहे.
नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, महापालिकांच्या प्रभागनिहाय आरक्षणासह महापौरांच्या आरक्षणाची घोषणा या महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे.
Today’s Horoscope, Tuesday : आजचे राशीभविष्य – मंगळवार, ४ नोव्हेंबर २०२५
Santosh Bhegde : माजी नगरसेवक संतोष भेगडे यांच्या वतीने तुळजापूर, अक्कलकोट दर्शन यात्रा
आज, मंगळवारी सायंकाळी चार वाजता राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे पत्रकार परिषद घेणार असून, या परिषदेत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू होण्याचीही शक्यता वर्तवली जात ( Elections)  आहे.
पहिल्या टप्प्यात नगरपालिका निवडणुका ( Elections) 
नगरपालिकांच्या प्रभागनिहाय आरक्षणासह नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर झाले आहे. मतदार यादीही अंतिम करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ( Elections) 
- पहिल्या टप्प्यात – २८९ नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.
 - दुसऱ्या टप्प्यात – ३२ जिल्हा परिषदा आणि ३३१ पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडतील.
 - तिसऱ्या टप्प्यात – २९ महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
 
निवडणूक कार्यक्रमाची रूपरेषा- निवडणूक कार्यक्रमात अधिसूचना प्रसिद्ध करणे, अर्ज भरणे, मतदान आणि निकाल जाहीर होण्यापर्यंतचा संपूर्ण कालावधी निश्चित केला जाणार आहे.
 - नगरपालिकांसाठी साधारण २१ दिवसांचा कार्यक्रम
 - जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ३० ते ३५ दिवसांचा कार्यक्रम
 - महापालिकांसाठी २५ ते ३० दिवसांचा कार्यक्रम ठरवला जाईल, अशी माहिती समोर ( Elections) आली आहे.
 




















