situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Eknath Shinde : माऊलीं अखंड आणि पवित्र अग्निहोत्राप्रमाणे आजही जगाला ऊर्जा व प्रेरणा देतात – एकनाथ शिंदे

Published On:
Eknath Shinde

Team My pune city – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर ( Eknath Shinde) सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सवा निमित्त सुवर्ण कलशारोहणाचे आयोजन करण्यात आले. होते.प्रथमतः माऊलीं मंदिर येथील महाद्वार जीर्णोद्धार निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाद्वार जीर्णोद्धार कार्यारंभ पूजन सोहळा पार पडला. तद्नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुवर्ण कलशाचे पूजन करण्यात आले. शांतीब्रम्ह मारोती बाबा कुरेकर, डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या शुभहस्ते हे कलशारोहण करण्यात आले.कार्यक्रमा दरम्यान दुभाषिक ज्ञानेश्वरीचे ऑडिओ बुक प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडला.

Devendra Fadnavis : समर्पणातून सुवर्ण कलश उभा राहिला – देवेंद्र फडणवीस


यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आळंदी हा ( Eknath Shinde) महाराष्ट्राच्या संस्कृतीचा,महाराष्ट्राच्या अंगणातला सुवर्ण पिंपळ आहे. आजच्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या ७५० व्या जयंती निमित्त सुवर्ण कलशाचे पूजन व इतर कार्यक्रम याठिकाणी आयोजित केले.१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन याचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. मंदिराच्या महाद्वारातून लाखो भक्त नत मस्तक होऊन, माऊलीचा गजर करीत पुढे जातात. ही वारकरी परंपरा फार मोठी आहे.सुवर्ण कलशा करता माऊलींच्या भक्तांना आवाहन केल्यानंतर कुठली आडकाठी न येता एवढ्या जलद गतीने सुवर्ण कलश्याचे काम झाले.
ही आगळी वेगळी घटना आहे.वारकरी संप्रदाय एव्हढी मोठी शक्ती आहे.


काही मागितल्या नंतर काही कमी पडत नाही. त्याचे ज्वलंत उदाहरण ( Eknath Shinde) पाहत आहे. माऊलींच्या या मंदिरावर सुवर्ण कलश चढविला जाणे ही महत्वची घटना आहे. भाविकांच्या योगदानामुळे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य सर्वांनाच मिळाले. ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष सर्वत्र सुरू आहे. हा जयघोष ही जगातील शक्तिशाली ऊर्जा आहे.ज्ञानोबा हा महाराष्ट्राचा श्वास आहे आणि आळंदी ही वारकऱ्यांची काशी,वाराणसी आहे.

प्राचीन काळी अलंकापुरी म्हणून लौकिक ( Eknath Shinde) असलेली ज्ञानोबांचं संजीवन अस्तित्व आजही सांभाळणारी नगरी आहे. याच मोठं महत्व आहे.येथे मराठी तत्वज्ञानाचा उगम झाला.मराठी पणाचं उगम स्थान आहे. भागवत धर्माचे तिर्थस्थळ आहे. आज नव्या संकेतस्थळाच्या माध्यमातून भागवत धर्मातील विचार प्रसाराची ही परंपरा पुढे नेण्यासाठी ज्ञानेश्वरी ऑडिओ बुकचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे.ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या दोन ते तीन मिनिटांच्या ऑडिओ क्लिप तयार करून पुढच्या पिढीपर्यंत हा विचार अधिक प्रभाविपणे पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.

Vadgaon Maval : सामाजिक कार्यकर्ते अशोक घोजगे यांचे निधन

देशात परकीय आक्रमण होत असताना भागवत ( Eknath Shinde) धर्माला जिवंत ठेवण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने आणि संतांनी केले. वारकरी संप्रदाय समाजाला सन्मार्ग दाखविणारी मोठी शक्ती आहे. त्यामुळे आपली संस्कृती कोणीही नष्ट करू शकला नाही. संत महात्मे अशावेळी सुविचार समाजात रुजवीत होते.

संत ज्ञानेश्वरांनी कर्म, ज्ञान, सदाचार, नीती, भक्तीची शिकवण दिली, त्यातून समाजाला विशालदृष्टी मिळाली. शेकडो वर्षानंतर आजही माऊली अखंड आणि पवित्र अग्निहोत्राप्रमाणे जगाला उर्जा आणि प्रेरणा देत आहेत. त्यामुळे या महाद्वारातून प्रवेश करतांना मीपण, अहंकार गळून पडेल सात्विकतेचा अनुभव भक्तांना मिळेल, असे त्यांनी सांगितले. आळंदी विकास आराखड्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी ( Eknath Shinde) दिली.

Follow Us On