Team My Pune City – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde)मध्यरात्री अचानक दिल्ली गाठल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यांच्या या तातडीच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.
राज्यात सध्या शिंदे सेना आणि भाजपमधील धुसफुस वाढली आहे. ठाण्यासह काही ठिकाणी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांतील कुरबुरी उघडपणे दिसत आहेत. तसेच निधी वाटपावरून शिंदे सेनेच्या आमदारांत नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्यात महायुतीतील आगामी राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Rashi Bhavishya 25 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?
Maval: पवना कृषक सेवा सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षपदी बाळू आखाडे यांची निवड
शिंदेसेना-भाजपमध्ये नाराजी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहे. त्याचवेळेस भाजपमध्ये इनकमिंग वाढले आहे. त्यात शिंदे सेना आणि अजितदादांच्या जुन्या-जाणत्या लोकांचाही समावेश असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे नाराजी पसरली आहे. तर अनेक ठिकाणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. ठाण्यासह इतर भागात दोन्ही पक्षात धुसफुस दिसून आली आहे. त्यामुळे दिल्ली दौऱ्याला महत्त्वाचे राजकीय वळण मिळाले आहे.
एकनाथ शिंदे हे आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे समजते. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शिंदे यांची उपस्थिती होती. या भेटीत राज्य सरकारमधील विविध विषयावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


















