Team MyPuneCity – खगोलशास्त्र आणि विज्ञानप्रसार क्षेत्रातील महान कार्याची अमूल्य ठेव मागे सोडणारे पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर ( Dr. Jayant Narlikar) यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड तारांगण सभागृहात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संचालक डॉ. प्रवीण तुपे, ऑटोक्लस्टरचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, लघुउद्योग संघटना पिंपरी चिंचवडचे जयंत कड, पिंपरी चिंचवड सोशल फाऊंडेशनचे जवाहर कोटवानी आणि सायन्स पार्कच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रद्धा खंपारिया उपस्थित होते.
Kashish Foundation : कशिश सोशल फाउंडेशनच्या फॅशन शो मधून भारतीय सैन्याला अनोखी मानवंदना
तारांगण प्रकल्पाच्या उभारणीत डॉ. जयंत नारळीकर ( Dr. Jayant Narlikar) यांनी मार्गदर्शकाची भूमिका बजावत बहुमोल योगदान दिले. त्यांच्या सहकार्यामुळेच आज हे तारांगण विज्ञानप्रसाराचे एक महत्त्वाचे केंद्र ठरले आहे, असे डॉ. प्रवीण तुपे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले. डॉ. नारळीकर यांचे खगोलशास्त्रातील संशोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी केलेले कार्य नेहमीच प्रेरणादायी राहील, असे ते म्हणाले.
सर्व उपस्थितांनी डॉ. नारळीकर यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाच्या शेवटी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली अर्पण ( Dr. Jayant Narlikar) करण्यात आली.