situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Dr. Deepak Tilak : ‘केसरी’चे विश्वस्त संपादक आणि ‘टिमवि’चे माजी कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांचे निधन

Published On:

Team MyPuneCity – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू आणि ‘केसरी’ या ऐतिहासिक दैनिकाचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक जयंत टिळक (Dr. Deepak Tilak वय ७४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. बुधवार, १६ जुलै रोजी पहाटे पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डॉ. दीपक टिळक (Dr. Deepak Tilak) यांच्या पश्चात त्यांचा सुपुत्र काँग्रेस नेते रोहित टिळक, कन्या, नातवंडे असा परिवार आहे. आज सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत टिळकवाड्यात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, दुपारी १२ वाजेनंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

Shirgaon: घरफोडीतील २५ लाखांचे सोने हस्‍तगत; गुन्हे शाखा युनिट-५ ची मोठी कामगिरी

एक प्रतिष्ठित आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व

डॉ. दीपक टिळक (Dr. Deepak Tilak) हे फक्त टिळक घराण्याचे वंशज नव्हते, तर समाजजीवनात सक्रीय योगदान देणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी ‘केसरी’ या ऐतिहासिक दैनिकाचे संपादकपद अनेक वर्षे भूषवले. तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचेही काही काळ कुलगुरूपद त्यांनी सांभाळले.२०२१ मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून जपानी भाषेच्या प्रसारासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले होते.

समाजसेवेची परंपरा आणि वैचारिक वारसा

डॉ. टिळक (Dr. Deepak Tilak) हे गोवा मुक्ती चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेतृत्व करणारे स्व. जयंतराव टिळक यांचे सुपुत्र होते. जयंतराव टिळक यांनी १२ वर्षे राज्यसभेचे सदस्य म्हणून, तर १६ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांच्या मातोश्री स्व. इंदुताई टिळक या ख्यातनाम सामाजिक कार्यकर्त्या होत्या. सेवा सदन व हुजूर पागा सारख्या शैक्षणिक संस्थांची धुरा त्यांनी अनेक वर्षे सांभाळली.बालपणापासून सामाजिक वातावरणात वाढलेल्या दीपक टिळक यांनी समाजहितासाठी अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.

Dehugaon: तब्बल १७ वर्षांनंतर तुकोबांची पालखी आळंदी मार्गे देहूत परतणार

राजकीय वारशाचीही जपणूक

डॉ. टिळक (Dr. Deepak Tilak) यांचे पुत्र रोहित टिळक हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. त्यांनी पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून २००९ व २०१४ मध्ये निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना दोन्ही वेळा पराभवाचा सामना करावा लागला.टिळक घराण्याचा वारसा पुढे नेणाऱ्या एका कार्यकर्त्याचे शांत, मितभाषी पण प्रगल्भ व्यक्तिमत्त्व हरपले आहे. पुणे आणि महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारितेच्या क्षेत्रातील हा एक सन्माननीय आवाज कायमचा थांबला आहे.

Follow Us On