situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

DPU Hospital : डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी पुणेकर रुग्णाला दिले दुसरे जीवन – दोन्ही तुटलेले हात यशस्वीरित्या पुन्हा जोडले

Published On:
DPU Hospital

११ तासांच्या अथक प्रयत्नातून डॉक्टरांच्या टीमने दोन्ही हात पुन्हा जोडून एका तरुणाचे आयुष्य वाचवले

Team My pune city –डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ( DPU Hospital) प्लास्टिक सर्जनच्या टीमने एक अत्यंत गुंतागुंतीची व आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. या प्रयत्नामुळे एका तरुण रुग्णाचे दोन्ही तुटलेले हात पुन्हा जोडण्यात आले आणि त्याला जीवनाची दुसरी संधी मिळाली.

३२ वर्षीय युवकावर धारदार शस्त्रांनी अत्यंत क्रूर हल्ला झाल्यानंतर तो अत्यवस्थ अवस्थेत डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी-पुणे ( DPU Hospital) येथे आणण्यात आला. त्याच्या दुखापती अतिशय गंभीर स्वरूपाच्या होत्या — डावा हात पूर्णतः तुटलेला होता आणि उजवा हात देखील जवळजवळ वेगळा झाला होता.

Car vandalism : धनकवडी परिसरात मध्यरात्री 20 गाड्यांची गुंडाकडून तोडफोड

प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे आणि रक्तदाब अत्यल्प झाल्यामुळे रुग्णाची प्रकृती अतिशय नाजूक झाली होती, ज्यामुळे शस्त्रक्रिया करणे हे अत्यंत कठीण व धाडसाचे ठरले. प्राथमिक वैद्यकीय तपासणीतच हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि तातडीने रुग्णाचे स्थिरीकरण करत प्लास्टिक सर्जरी विभागाला तत्काळ हस्तक्षेपासाठी सूचित केले.

तत्काळ आणि सर्वांगीण वैद्यकीय ( DPU Hospital) तपासणीसह आवश्यक तातडीच्या निदान चाचण्या करण्यात आल्या. दुखापतीचे गांभीर्य आणि पुन्हा हात जोडण्यासाठी उपलब्ध असलेल्या मर्यादित वेळेचा विचार करता, शस्त्रक्रिया विभागाने क्षणाचाही विलंब न करता रुग्णाला थेट ऑपरेशन थिएटरमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला. रुग्णाची प्रकृती अत्यंत नाजूक असल्यामुळे आणि परिस्थितीच्या गंभीरतेमुळे दोन्ही हातांवर एकाचवेळी शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन स्वतंत्र शल्यचिकित्सक पथकांनी समांतररीत्या काम करण्याची योजना आखली.

Santosh Dabhade Patil : माजी नगरसेवक, निर्मलवारी संयोजक संतोष दाभाडे पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा

यानंतर सुरू झाली एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दीर्घकालीन शस्त्रक्रिया — सायंकाळी ६:३० वाजता सुरू झालेली ही शस्त्रक्रिया सलग संपूर्ण रात्री चालू राहिली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५:३० वाजता यशस्वीरित्या पूर्ण झाली. प्लास्टिक सर्जरी विभागातील( DPU Hospital) वरिष्ठ प्राध्यापक आणि निवासी डॉक्टरांचा एक समर्पित आणि तज्ज्ञ संघ या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी सज्ज होता. या शस्त्रक्रियेमध्ये डॉ. गुरुस्वामी विश्वनाथ, डॉ. भूषण पाटील, डॉ. ज्योतिका चव्हारिया आणि डॉ. पूजा दांडेकर या तज्ज्ञ शल्यविशारदांनी नेतृत्व केले, ज्यांना विभागातील इतर वरिष्ठ आणि निवासी डॉक्टरांचे सहकार्य लाभले.

अत्याधुनिक मायक्रो सर्जिकल तंत्रांचा वापर करत, शस्त्रक्रिया करणाऱ्या तज्ज्ञांनी उच्च शक्तीच्या मायक्रोस्कोपखाली काम करत दोन्ही हातांमधील ( DPU Hospital) नाजूक रक्तवाहिन्या, मज्जातंतू, स्नायू व हाडे अत्यंत बारकाईने पुन्हा जोडली.

या प्रक्रियेसाठी अत्युच्च अचूकता, सुसंगत समन्वय आणि पुनर्रचना मायक्रोसर्जरीतील सखोल ज्ञानाची आवश्यकता होती. वैद्यकीय टीमच्या कौशल्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि निष्ठेमुळे दोन्ही हातांमध्ये यशस्वीरित्या रक्तपुरवठा पुन्हा सुरू झाला आणि दोन्ही हात पुन्हा जोडण्यात आले. यामुळे केवळ रुग्णाचे हात वाचले नाहीत, तर त्याचे जीवनमान, स्वावलंबन आणि उदरनिर्वाहाची क्षमताही सुरक्षित राहिली.

मा. डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्र-कुलपती , डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) पिंपरी, पुणे यांनी यशस्वी शस्त्रक्रियेबाबत ( DPU Hospital) आपले विचार मांडताना सांगितले, “ही शस्त्रक्रिया केवळ वैद्यकीय क्षेत्रातील यश नव्हे, तर आमच्या वैद्यकीय व्यवस्थेच्या सामर्थ्याची जिवंत साक्ष आहे. डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आम्ही अशा एकात्मिक आरोग्यसंस्थेची उभारणी केली आहे जिथे अत्यंत जटिल आणि जीव वाचवणाऱ्या शस्त्रक्रिया अत्यंत अचूकतेसह पार पाडल्या जातात. मायक्रोसर्जरीसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आज आम्ही एका रुग्णाला नवजीवन देऊ शकलो, याचा मला मनापासून अभिमान आहे.

मी आमच्या प्लास्टिक सर्जरी विभागाच्या चमूचे विशेष कौतुक करते ज्यांनी आपल्या कौशल्य, मेहनत आणि समर्पणातून वैद्यकीय उपचारांच्या ( DPU Hospital) नव्या मर्यादा गाठल्या. भविष्यातही आम्ही आधुनिक तंत्रज्ञान आणि विशेष प्रशिक्षण यामध्ये सातत्याने गुंतवणूक करून, भारतासह जगभरातील रुग्णांना जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे (अभिमत विद्यापीठ) विश्वस्त व खजिनदार, मा. डॉ. यशराज पाटील, म्हणाले, “ही उल्लेखनीय यशोगाथा डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ( DPU Hospital) प्रगत, परिणामाधिष्ठित वैद्यकीय उत्कृष्टतेच्या दृष्टिकोनाची प्रचिती देणारी आहे. आमच्या शल्यचिकित्सा, क्रिटिकल केअर आणि सहाय्यक विभागांमधील सुरळीत समन्वय आमच्या एकात्मिक दृष्टिकोनाची ताकद दर्शवतो.

जवळपास अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतून यशस्वी पुनःस्थापन घडवून आणणाऱ्या आमच्या चमूच्या समर्पण आणि कौशल्याचा मला अभिमान आहे. ही उपलब्धी आमचे कॉम्प्लेक्स रीकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीमध्ये नेतृत्वाचे स्थान अधिक बळकट करते. हे यश आम्हाला रुग्णसेवेच्या नव्या कक्षा गाठण्यासाठी आणि वैद्यकीय परिणामांच्या नव्या उंची निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रेरणा देत राहील.”

डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय ( DPU Hospital) , रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे चे अधिष्ठाता डॉ. रेखा अर्कोट यांनी सांगितले, “ही यशस्वी शस्त्रक्रिया म्हणजे आमच्या सक्षम आरोग्य व्यवस्थेचे साक्षीदार उदाहरण आहे – जिथे प्रगत वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर आणि समर्पित सहाय्यक कर्मचारी एकत्र येऊन अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करतात.

आमच्या रुग्णालयाने एका तरुणाला पुन्हा एकदा आयुष्य जगण्याची संधी दिली, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. या जीवनावश्यक आणि अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेला यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचा – शल्यविशारद, समन्वयक, नर्सिंग स्टाफ आणि प्रशासन – मन:पूर्वक आभारी आहे.”

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ( DPU Hospital) , पिंपरी, पुणे येथील प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. गुरुस्वामी विश्वनाथ यांनी सांगितले, “तुटलेल्या हाताला पुन्हा जोडणे आणि शक्य तितक्या लवकर रक्तपुरवठा पूर्ववत करणे हे अत्यंत आवश्यक होते, कारण यावर त्या हाताच्या जिवंत राहण्याचे भविष्य अवलंबून होते. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून रुग्ण सध्या रिकव्हर होतो आहे.

ही गंभीर इजा असूनही, योग्य उपचार आणि काळजीमुळे चांगले कार्यक्षम परिणाम मिळतील, असा आम्हाला विश्वास आहे. या वयात जर शस्त्रक्रिया अपयशी ठरली असती, तर केवळ त्याचे हातच गमावले गेले नसते, तर त्याची उपजीविका आणि कुटुंबाचा आधार देण्याची क्षमता देखील नाहीशी झाली असती. या शस्त्रक्रियेमुळे ( DPU Hospital) त्याला स्वावलंबन आणि आत्मसन्मान पुन्हा मिळवण्याची खरी संधी मिळाली आहे.”

Follow Us On