situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

DJ Volume : डीजेचा आवाज वाढलाच…. पोलिसांकडून कारवाईची प्रक्रिया सुरु

Published On:
DJ Volume

Team My Pune City – पिंपरी-चिंचवड शहरात ( DJ Volume) पाच, सात, नऊ आणि दहाव्या दिवशी गणपती विसर्जन पार पडले. या विसर्जन दिवशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी डीजेचा वापर केल्याचे दिसून आले. पोलिसांनी डीजे आणि लेजर लाईट न लावण्याबाबत आवाहन केले होते. त्याचे दुष्परिणाम देखील सांगण्यात आले होते. मात्र काही मंडळांनी पोलिसांच्या या आवाहनाला पायदळी तुडवल्याचा अनुभव आला. पोलिसांनी मोठ्या आवाजात वाजणाऱ्या डीजेच्या आवाजाची पातळी नोंदवली आहे. त्यानुसार पुढील काही दिवसांमध्ये संबंधित मंडळांवर कारवाई केली जाणार आहे.

Rashi Bhavishya 8 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

शहर परिसरात 2 हजार 146 सार्वजनिक तर 2 लाख 65 हजार 274 घरगुती ( DJ Volume) गणपतींची स्थापना झाली. त्यानंतर सातव्या दिवशी 521, नवव्या दिवशी 263, दहाव्या दिवशी 373 अशा 1157 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन झाले. उर्वरित 989 सार्वजनिक गणपतींचे शनिवारी विसर्जन झाले. घरगुती गणपतींचे दीड, पाच, सात, नऊ आणि दहाव्या दिवशी विसर्जन झाले. घरगुती गणपती विसर्जन गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात झाले. मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मिरवणुका काढून गोंगाट केला. पोलिसांनी गणेशोत्सवात ५०० पेक्षा अधिक ठिकाणी आवाजाची तीव्रता तपासली. त्यात काही ठिकाणी मर्यादेपेक्षा अधिक आवाज असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी लेजर वापरावर निर्बंध घातले होते. त्याकडेही मंडळांनी दुर्लक्ष केले. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात लेजर प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले.

Bhosari News : अनधिकृत मंडप, स्टेज विरोधात कारवाईची मागणी

डीजेचे दुष्परिणाम

डीजेचा आवाज सामान्यतः १०० ते १२० डेसिबलपेक्षा जास्त ( DJ Volume) असतो, जो मानवी कानासाठी अत्यंत धोकादायक आहे. जास्त वेळ अशा आवाजाच्या संपर्कात राहिल्यास ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते किंवा कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. मोठा आवाज तणाव, चिडचिड आणि अस्वस्थता वाढवतो. यामुळे एकाग्रता कमी होते, निद्रानाश होतो आणि डोकेदुखीचा त्रास सुरू होतो.

डीजेच्या आवाजामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयाची गती जलद होते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. विशेषतः वृद्ध आणि हृदयविकार असलेल्या लोकांसाठी हे अत्यंत धोकादायक आहे. मोठ्या आवाजामुळे कानात वेदना होणे, चक्कर येणे, उलटी होणे आणि घसा खवखवणे यांसारख्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. लहान मुलांचे कान अत्यंत संवेदनशील असतात, त्यामुळे त्यांना कायमचा श्रवणदोष होऊ शकतो. तसेच, गरोदर महिलांवर आणि गर्भातील बाळाच्या वाढीवरही नकारात्मक परिणाम होतो. डीजेचा निसर्गावर देखील विपरीत परिणाम होतो.

अधिक आवाजाची ठिकाणे

गणेश विसर्जनाच्या दिवशी चिंचवड मधील चापेकर चौक, पिंपरी मधील ( DJ Volume) शांतीनगर आणि भोसरी गावठाण येथे आवाजाची पातळी सर्वाधिक राहिली. ही सर्व ठिकाणी रहिवासी क्षेत्र आहेत. येथे रात्रीच्या वेळी 45 डेसिबल ही आवाजाची मर्यादा आहे. चापेकर चौकात 95.8 डेसिबल, शांतीनगर मध्ये 108.9 डेसिबल आणि भोसरी मध्ये 86.2 डेसिबल आवाज नोंदविला गेला. याशिवाय थेरगाव, वाकड, रावेत, कोकडे चौक आणि बोपोडी या परिसरामध्ये 75 डेसिबल पेक्षा अधिक आवाज नोंदवला गेला.

आठ मंडळांवर करवाईसाठी अहवाल पाठवला

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील आठ गणेशोत्सव ( DJ Volume) मंडळांच्या ध्वनी पातळीचा अहवाल पुढील कारवाईसाठी पाठवला आहे. त्यामध्ये चैत्रबन मित्र मंडळ, राजश्री छत्रपती शाहू महाराज संयुक्त मराठा युवा प्रतिष्ठान, समर्थ नगर तरुण मित्र मंडळ, युवाशक्ती मित्र मंडळ, स्वराज्य युवा प्रतिष्ठान, ओम साई राम मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, जनसेवा मित्र मंडळ या मंडळांचा समावेश आहे.

विभिन्न क्षेत्रात आवाजाची मर्यादा (डेसिबल मध्ये)

क्षेत्र दिवसा रात्री
औद्योगिक 75 70
व्यावसायिक 65 55
रहिवासी 55 45
शांत क्षेत्र 50 40

तळेगाव दाभाडे मध्ये मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण झाल्याच्या तक्रारी आल्या. नियमाचे नक्कीच उल्लंनघन झाल्याचे उघड झाले ( DJ Volume) आहे. 48 ठिकाणी ध्वनी तीव्रता चेक केली असून लेझरच्या दोन तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. गणपती विसर्जन झाल्यावर कारवाईचे स्वरूप स्पष्ट होईल.

  • विशाल गायकवाड, पोलीस उपायुक्त

सांगवी मध्ये मोठ्या प्रमाणात डीजेचा वापर झाला. राजकीय पाठबळ असल्याने अनेक मंडळांनी डीजे लावण्याची हिम्मत केली. अशा मंडळांवर कठोर कारवाई ( DJ Volume) झाली पाहिजे.

  • अण्णा जोगदंड, सामाजिक कार्यकर्ते.

Follow Us On