situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Diwali Muhurta : या दिवाळीत करा योग्य वेळी पूजा! 2025 च्या पंचांगानुसार दीपावलीचे सर्व खास मुहूर्त 

Published On:
Diwali Muhurta

Team My Pune City – आगामी रमा एकादशीपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत ( Diwali Muhurta) चालणाऱ्या दिवाळी पर्वाचे धार्मिक कार्यक्रम आणि मुहूर्त यांची माहिती ज्योतिषभास्कर उमेश स्वामी (मो. ९९२२३१११०४) यांनी प्रसिद्ध केली आहे. या काळात भक्तांनी विविध पूजा, दीपदान आणि धार्मिक विधींमधून श्रद्धेने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

🔹 रमा एकादशी — अश्विन कृष्ण एकादशी, शुक्रवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२५.

या दिवशी संध्याकाळी घरासमोर तेलाचे दिवे लावून, रोषणाई करावी. एकादशीचे व्रत आणि उपवास करून विष्णू पूजन केल्यास मन:शांती व सुखसमृद्धी लाभते.

Cyber ​​Fraud : ८८ वर्षीय ज्येष्ठाची सायबर फसवणूक; १९.८० लाखांचा गंडा

🔹 वसु बारस — शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२५ (सूर्यास्ताच्या वेळी).

या दिवशी गाय आणि तिच्या वासराचे (सवत्स गाय) पूजन करावे. गाईला उडीद वड्यांचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी दुधजन्य पदार्थ सेवन टाळावा, असे धर्मशास्त्र सांगते.

🔹 धनत्रयोदशी व यमदीपदान — शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५.

या दिवशी सकाळी ८.१० ते ९.२४, दुपारी १२.२५ ते ४.४२ आणि सायंकाळी ६.१० ते ७.१२ हा शुभ मुहूर्त आहे.सायंकाळी कणकेचा दिवा तयार करून घराच्या दक्षिण दिशेला लावावा व पुढील श्लोक म्हणून यमदेवतेला नमस्कार करावा. असे केल्यास अकाली मृत्यू टळतो, असे शास्त्र मानते.

Valvan: वलवण गावातील श्री महालक्ष्मी मंदिरात चांदी-सोन्याची चोरी; देवीचा मुखवटा व मंगळसूत्र लंपास

🔹 नरक चतुर्दशी (अभ्यंगस्नान) — रविवार, २० ऑक्टोबर २०२५. ( Diwali Muhurta)

पहाटे ५.२० वाजता उठून सुगंधी तेलाने अंगाला अभ्यंग करावे. पिताजी असलेल्या व्यक्तींनी अक्षतांनी स्नान करावे, तर इतरांनी तिळांनी स्नान करावे.यानंतर दक्षिणेकडे तोंड करून यमदेवतेची १४ नावे उच्चारून तर्पण करावे. या विधीने आयुष्यवृद्धी व आरोग्यप्राप्ती होते.

🔹 लक्ष्मी-कुबेर पूजन (मुख्य दिवाळी) — मंगळवार, २१ ऑक्टोबर २०२५.

सकाळी ९.२५ ते १.४६, दुपारी ३.१३ ते ४.४१, तसेच रात्री १०.४६ ते ११.४५ या कालावधीत शुभ मुहूर्त आहे. या दिवशी श्रीलक्ष्मी व कुबेर पूजन, दीपदान आणि घरातील आर्थिक वह्यांची पूजन केल्यास अखंड लक्ष्मीप्राप्ती होते.

🔹 गोवर्धन पूजन आणि अन्नकूट महोत्सव — बुधवार, २२ ऑक्टोबर २०२५. ( Diwali Muhurta)

या दिवशी विविध मिठाई व भाजीपाला देवाला अर्पण करून गोवर्धन पूजन केले जाते. गाईची पूजा ही या विधीचा महत्त्वाचा भाग आहे.

🔹 बलिप्रतिपदा व वहीपूजन (दिवाळी पाडवा) — २२ ऑक्टोबर, बुधवार.

या दिवशी नव्या वह्या व लेखनसाहित्याची पूजा करून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात केली जाते. स्त्रियांनी पतीला अभ्यंगस्नान घालून ओवाळावे, तर पुरुषांनी चित्रगुप्त व यमदेवतेचे तर्पण करावे.

🔹 भाऊबीज (यमद्वितीया) — गुरुवार, २३ ऑक्टोबर २०२५. ( Diwali Muhurta)

या दिवशी बहिणीने भावाला अभ्यंगस्नान घालावे आणि त्याच्याकडून भेटवस्तू घ्यावी. यामुळे भावंडांमध्ये प्रेम आणि आयुष्यभराचे स्नेहबंध वृद्धिंगत होतात.

🔹 तुळशी विवाह — २ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान.

सूर्यास्तावेळी तुळशी व श्रीकृष्णाचा विवाह लावला जातो. या दिवशी कार्तिक महिन्याची पुण्यप्राप्ती अधिक होते.

🔹 वैकुंठ चतुर्दशी — गुरुवार, ४ नोव्हेंबर २०२५. ( Diwali Muhurta)

या दिवशी रात्रभर विष्णू व शिव पूजन करावे. पहाटे बिल्वपत्राने भगवान शिवाची पूजा करण्याची परंपरा आहे.

🔹 त्रिपुरारी पौर्णिमा (दीपोत्सवाचा समारोप) — बुधवार, ५ नोव्हेंबर २०२५.

सूर्यास्तानंतर आवळीच्या झाडाखाली ७५० त्रिपुर वाती लावून दीपोत्सव साजरा केला जातो. या दिवशी त्रिपुरासुराचा वध झाला, अशी आख्यायिका आहे.

 या सर्व उत्सवांचे पालन श्रद्धा, नियम व विधीनुसार केल्यास दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि अखंड लक्ष्मीप्राप्ती होते, असा उल्लेख उमेश स्वामी यांनी केलेल्या ( Diwali Muhurta) पंचांग सूचनेत करण्यात आला आहे.

इति शुभं भवंतु.

Follow Us On