Team My Pune City – आळंदी–पंढरपूर पालखी ( Diveghat ) महामार्गावर सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे 26 सप्टेंबर 2025, शुक्रवार रोजी दिवेघाट मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत हा रस्ता बंद राहील, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दिली असून, वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कालावधीत रस्त्याच्या रुंदीकरणासाठी स्फोटकांचा वापर करून ब्लास्टिंग करण्यात येणार आहे. ब्लास्टिंगदरम्यान दगडांचे तुकडे उडण्याचा धोका असल्याने अपघात टाळण्यासाठी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला ( Diveghat ) आहे. त्यामुळे हडपसर–दिवेघाट मार्गावरील सर्व वाहने थांबवली जाणार आहेत.
Talegaon News : तळेगावच्या वैभवात भर! राज्यातले सर्वात उंच शिवशंभू शिल्प तळेगावात स्थापित होणार
याआधीही अशाच प्रकारे कामासाठी ब्लास्टिंग करण्यात आले होते आणि त्यावेळीही दिवेघाट मार्ग बंद ठेवण्यात आला होता. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 अंतर्गत येतो. पुणे व परिसरातून सांगली, सोलापूर, पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी रहदारी या मार्गावरून होते. त्यामुळे वाहतूक बंदोबस्तामुळे इतर मार्गांवर गाड्यांची गर्दी वाढण्याची शक्यता ( Diveghat ) आहे.