Team My Pune City – महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने नगर रचना व मूल्यमापन संचालनालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे शहरातील नगर रचना विभागात नवे अधिकारी नेमण्यात आले आहेत. या बदल्यांमुळे दोन्ही शहरांतील शहरी नियोजन आणि विकास अधिक प्रभावीपणे राबवला जाण्याची अपेक्षा (Director of Town Planning) आहे.
Katraj Crime News : तीन पिस्तूल व सहा जिवंत काडतुसासह सराईत अटकेत
नवीन आदेशानुसार, किशोर गावडे यांची नियुक्ती संचालक, नगर रचना, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (प्र.नि.) म्हणून करण्यात आली आहे. गावडे यांना ‘Urban Planning Reform’ अंतर्गत केंद्र शासनाच्या विशेष योजनांमध्ये कामाचा अनुभव आहे.दरम्यान, सारिका माने-बोकणकर (विनायक) यांची संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे (नगर रचना संशोधन घटक) या पदावर बदली करण्यात आली आहे.
याशिवाय इतर बदल्यांमध्ये सौरभ गायकवाड यांना छत्रपती संभाजीनगर येथे उप संचालक म्हणून पाठवले गेले असून. सिध्देश कदम यांना कोल्हापूर विभागीय विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमण्यात आले ( Director of Town Planning) आहे.