Team My pune city – समाजप्रेरक आणि वाचनसंस्कृतीचे महत्त्व जाणणारे नागरिक( Dhyas Foundation) हे खरे बदलाचे शिल्पकार असतात, याचे उत्तम उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले. आळंदी येथील दिनेश कुऱ्हाडे पाटील यांनी त्यांची कन्या परिणिती दिनेश कुऱ्हाडे (इयत्ता पहिली) हिच्या वाढदिवसानिमित्त ध्यास फौंडेशन संचलित महर्षी वाल्मिकी विद्यावर्धिनी, डॉ.माधवराव सानप विद्यालयस ३० हजार रुपयांची १५० पुस्तके भेट देऊन एक आगळीवेगळी सामाजिक भावना जपली आहे.
PMRDA : पीएमआरडीएच्या ४ टीपी स्कीमला मिळाली मंजुरी
वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या ज्ञानवाढीसाठी उपयुक्त ठरतील अशी नवी कोरी दर्जेदार पुस्तके कुऱ्हाडे यांनी शाळेच्या वाचनालयासाठी भेट( Dhyas Foundation) दिली. यामध्ये मराठी साहित्य, विज्ञान, निबंध, आत्मचरित्र, प्रेरणादायी चरित्रे तसेच मुलांच्या बौद्धिक विकासास हातभार लावणारे ग्रंथ यांचा समावेश आहे.
Poultryshed : पोल्ट्रीशेड नोंदणी अभियान मावळात वेगाने सुरू
या उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापिक अक्षता कुलकर्णी यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आणि सांगितले की, “ही प्रेरणादायी कृती इतर नागरिकांसाठी देखील आदर्श ठरेल. समाजातील प्रत्येकाने अशा प्रकारे शिक्षण क्षेत्राला हातभार लावल्यास नव्या पिढीला नक्कीच समृद्ध दिशा ( Dhyas Foundation) मिळेल.”