Team My Pune City – प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या ( Dharmendra Death Rumours) निधनाच्या अफवांमुळे मंगळवारी सकाळपासून सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. काही वृत्तमाध्यमांनीही त्यांचे निधन झाल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्याने चाहत्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली. मात्र काही तासांतच धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांनी या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचे स्पष्ट करत चाहत्यांना दिलासा दिला.
Elections : स्थानिक स्वराज्य निवडणुका : चंदगडमध्ये शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र, नव्या राजकीय समीकरणाने खळबळ
अभिनेता धर्मेंद्र यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक( Dharmendra Death Rumours) नसल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना काही काळासाठी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले की, धर्मेंद्र उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांची प्रकृती आता स्थिर आणि सुधारत आहे.
Today’s Horoscope 11 November 2025 : आजचे राशीभविष्य – मंगळवार, ११ नोव्हेंबर २०२५
या अफवांनंतर धर्मेंद्र यांच्या पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांनी सोशल मीडियावरून औपचारिक प्रतिक्रिया देत स्पष्ट केले की, “बाबा सुरक्षित आहेत, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. काही माध्यमांनी दिलेली निधनाची बातमी पूर्णपणे चुकीची ( Dharmendra Death Rumours) आहे.”
दरम्यान, धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी माहिती मिळताच सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा यांसारख्या बॉलिवूड स्टार्सनी रुग्णालयात भेट देऊन त्यांची विचारपूस केली. हॉस्पिटल बाहेर चाहत्यांची मोठी गर्दी होत असल्याने सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
देओल कुटुंबीयांनी चाहत्यांना विनंती केली आहे की, “अफवांवर विश्वास ठेवू नका. धर्मेंद्र यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना ( Dharmendra Death Rumours) करा.”


















