Team MyPuneCity – धानोरे येथील कंपनीच्या परिसरात एका मोकळ्या जागेत संतोष मारुती ठोंबरे यांचा शेळ्या मेंढ्या धनगरवाडा वसला आहे.या धनगर वाड्या पासून म्हणजेच या पाला पासून काही अंतरावर पड रानात शेळ्या मेंढ्या चरत होत्या.त्या पड रानात कंपनीचे सांडपाणी सोडण्यात आले.ते पाणी शेळ्या मेंढ्या पेल्या त्यामध्ये ३२ शेळ्या मेंढ्या चा मृत्यू झाला.५ ते ६ अजून गंभीर आहेत.ते पाणी पिल्याने शेळ्यांना मेंढ्यांना विषबाधा झाली.रासायनिक विषारी पाणी असल्याने या शेळ्या मेंढ्यां चा मृत्यू झाला.असे यावेळी संतोष ठोंबरे यांनी सांगितले.तसेच घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली आहे .तसेच पशू वैद्यकीय डॉक्टर आले होते.काही शेळ्या मेंढ्यांना लस देण्यात आली आहे.
५ ते ६ अजून गंभीर आहेत.मेलेल्या शेळ्या मेंढ्याची तपासणी,पंचनामा केला.अजून पशू वैद्यकीय अहवाल अजून प्राप्त झाला नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Takwe Budruk: टाकवे बु.येथे पाण्याच्या पाइपलाइनच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी; परस्परविरोधी फिर्यादींमुळे गुन्हे दाखल
जवळपास २०० शेळ्या मेंढ्या आहेत .त्यातील ३२ शेळ्या मेंढ्या चा मृत्यू झाला आहे.यामध्ये २० ते २२ शेळ्या होत्या.बाकी मेंढ्या असल्याचे यावेळी सांगितले. मृत्यू पावलेल्या सर्व शेळ्या मेंढ्या वाहना भरून एका ठिकाणी नेण्यात आल्या. व त्या ठिकाणी मोठा जेसीबीच्या सहाय्याने खड्डा घेत त्या खड्ड्यात ठेवल्या व वरून परत माती वगैरे टाकण्यात आली.

जवळपास ३२ शेळ्या मेंढ्या मेल्याने ५ ते६ लाखाच्या पुढे नुकसान झाले आहे. शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा संतोष ठोंबरे व त्यांच्या चूलत भावाने यावेळी व्यक्त केली.