Team My pune city – शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या दालनामध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडली आहे.
आज उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली, या भेटीला आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धातास चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना ‘हिंदीची सक्ती हवीच कशाला’ हे पुस्कत देखील भेट दिलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार विरोधी पक्ष नेतेपद, त्रिभाषा सूत्र आणि हिंदीसक्ती या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली आहे.
बुधवारी देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis)यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोपसमारंभाप्रसंगी विधानभवनात बोलताना उद्धव ठाकरे यांना थेट सत्तेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिले होते. तुम्हाला इकडे स्कोप आहे, तुम्ही येऊ शकता, असं त्यांनी म्हटले होते.
Artificial flowers : कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी, शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर जोरदार मोर्चा
तसेच उद्धव आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र येण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. ‘एकत्र आलो आहोत, एकत्र येण्यासाठी’ असे उद्धव ठाकरे यांनी मराठी विजय मेळाव्यात जाहीरपणे म्हटले होते.
त्यानंतर आज उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची बैठक पार पडल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उधाण आल्याचे पाहायला मिळाले.