भाजपाने बिहार निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 40 नेत्यांचा यादीत समावेश करण्यात आला आहे.ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा, नितीश कुमार यांच्या युतीने पूर्ण तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी भाजपाच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.ते बिहारच्या भाजप उमेदवारांसाठी प्रचार सभा घेणार आहेत.
भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण 40 स्टार प्रचारकांचे नाव(Devendra Fadnavis) आहे. यात महाराष्ट्रातून विनोद तावडे , देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. विनोद तावडे भाजपाचे बिहार विधानसभा निवडणूक प्रभारी आहेत. महाराष्ट्रातून फडणवीस यांच्यासोबत तावडे यांचेदेखील या स्टार प्रचारकांच्या यादीत नाव आहे.
Uday Nirgudkar: शैक्षणिक संस्थांमध्ये राजकारण शिरल्याने शिक्षणाचा बोजवारा – डॉ. उदय निरगुडकर
Maval: मावळचे भजनसम्राट ह.भ.प. नंदकुमार शेटे महाराज यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने सन्मान
स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाहा, केंद्रीय मंत्री नितन गडकरी ,भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा, , शिवराजसिंह चौहान, धर्मेंद्र प्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा, होन यादव, दिल्ली की मुख्यमंत्री रेखा गुप्ता,स्मृती इराणी, केशव प्रसाद मौर्य, सी आर पाटील, पवन सिंह, मनोज तिवारी, रवि किशन, विनोद तावडे , देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.