Team MyPuneCity –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केली. त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.
Lohagad Fort: लोहगड किल्ल्यावर पुरातत्व विभाग, ग्रामस्थ व शिवप्रेमींचा जल्लोष ..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ,यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पातील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार आहे.
Alandi:आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीवर अत्याचार; कीर्तनकार महिला व कुटुंबीयांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, “मुंबई- पुणे या महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे हे अंतर कमी आहे. याचा प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. महामार्गावरील घाट असलेला भाग या प्रकल्पामुळे टाळता येणार असून घाटमार्गामुळे होणारा वाहतुक अडथळा दूर होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर या महामार्गावर आरामदायी प्रवास होणार आहे.’ या लिंकमुळे साडेसहा किलोमीटरचे अंतर आणि सुमारे अर्धा तासाचा प्रवास वेळ वाचणार आहे.मिसिंग लिंक प्रकल्पांत एकूण तीन बोगदे आहे. हा देशातल्या सर्वात जास्त लांबीचा बोगदा ठरणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले.
या प्रकल्पाचे एकूण ९४ टक्के काम पूर्ण करण्यात आले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, हा संपूर्ण मार्ग डिसेंबर २०२५ पर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार बाळा भेगडे, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सह व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल, राजेश पाटील मुख्य अभियंता राजेश निघोट, अधीक्षक अभियंता राहुल वसईकर उपस्थित होते.