Team MyPuneCity — प्रारूप सुधारित विकास आराखड्यातील ( Development plan) जनविरोधी आणि भावनांना ठेच देणाऱ्या आरक्षणांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे गुरुवारी शहरात भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शगुन चौक, पिंपरी येथून सुरू झालेला हा मोर्चा जोरदार घोषणाबाजी करत पुणे-मुंबई महामार्गावरून मार्गक्रमण करत महापालिका मुख्यालयावर धडकला.
या आंदोलनात विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक अजित गव्हाणे, माजी उपमहापौर डब्बू आसवाणी, वैशाली घोडेकर, ( Development plan) फजल शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
TP Scheme in Darumbre : दारुंब्रे गावातील टी.पी. योजनेला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
“भावनांचा अपमान करणारा आराखडा – डीपी रद्द करावा” : योगेश बहल
शहराध्यक्ष योगेश बहल यांनी विकास आराखड्यावर तीव्र टीका करत सांगितले, “सध्याचा डीपी प्लॅन चुकीच्या पद्धतीने बनवण्यात आला आहे. त्यात ( Development plan) बेकायदेशीर आरक्षणे असून, विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या भावना पायदळी तुडवल्या जात आहेत.”
भीमसृष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात ( Development plan) पोलीस आयुक्तालय व बस टर्मिनससाठी ठेवलेले आरक्षण तत्काळ मागे घ्यावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली. त्यांनी संपूर्ण डीपी व टीपी आराखडा रद्द करून नव्याने, जनतेशी सल्लामसलत करून आराखडा तयार करण्याचे आवाहन केले.


“कत्तलखान्याचे आरक्षण नागरिकांना अशोभनीय” : कविता आल्हाट
महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट यांनी मोशीतील कत्तलखान्यासाठी प्रस्तावित आरक्षणावर नाराजी व्यक्त केली. “शहरात पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन या मूलभूत सुविधा कोलमडल्या आहेत. तरीही प्रशासन अशा भावना दुखावणाऱ्या प्रकल्पांना प्राधान्य देत आहे. हे शहरवासीयांना मान्य नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
Pimpri Chinchwad Crime News 07 August 2025 : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची हत्या
“ही मनमानी थांबवा” : बनसोडे व लांडे यांची मागणी
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे व माजी आमदार विलास लांडे यांनी देखील महापालिकेच्या विकास आराखड्याचा निषेध केला. “हा डीपी जनतेच्या हिताविरोधी ( Development plan) आणि बिल्डरधार्जिणा असून, महापालिकेची ही मनमानी थांबवलीच पाहिजे,” असा सज्जड इशारा त्यांनी दिला.
स्मारकस्थळांवरील आरक्षणांना विरोध
थेरगाव येथील एका माजी सैनिकाने आपल्या ( Development plan) भावना व्यक्त करत सांगितले की, “पिंपरीतील भीमसृष्टी परिसरातील आंबेडकर स्मारक व परिसर हे स्मारकप्रेमी नागरिकांसाठी श्रद्धास्थान आहे. येथे पोलीस आयुक्तालय व बस टर्मिनस यांसारख्या प्रशासकीय इमारतींचे आरक्षण म्हणजे बाबासाहेबांचा अपमान आहे.” त्यांनी प्रॉपर्टी कार्ड मिळावे आणि अधिकृत घरांवर टाकलेली आरक्षणे रद्द करावीत, अशी मागणी केली.
नागरिकांचा संताप, शांततेत निषेध
मोर्चात सहभागी नागरिकांनी विविध प्रकारच्या ( Development plan) आरक्षणांवर प्रशासनाचा तीव्र निषेध केला. विकसनशील व प्रतिबंधित क्षेत्रांतील गोंधळ, पूररेषेतील अनिश्चितता आणि अधिकृत बांधकामांवर केलेली अडचणी नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न ठरत आहेत. काही ठिकाणी नागरिकांनी निषेध म्हणून आरक्षणांचे फलक फाडले.
मोर्चा पूर्णतः शांततेत पार पडला. महापालिका मुख्यालयावर पोहोचल्यावर प्रशासनाला निवेदन सादर करून संपूर्ण डीपी व टीपी आराखडा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, नव्याने सुसंगत, जनतेशी सल्लामसलत करून आराखडा तयार करण्याची मागणी करण्यात ( Development plan) आली.