Team My Pune City – गेल्या चार दिवसां पासून आळंदी देवाची ता.(हवेली)(Dehuphata) देहूफाटा येथील दाभाडे यांच्या शेतात बिबट्याचा वावर आढळून येत आहे. यामुळे तेथील परिसरातील नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दि.२४ रोजी पासून ते अद्याप पर्यंत त्या परिसरात बिबट्याचा वावर आहे.देहूफाटा येथील सुभाष दाभाडे यांच्या शेतात त्याचे वास्तव्य दिसून असून त्याचा व्हिडिओ आज व्हायरल झाला आहे. तेथील परिसरातील कुत्र्याला तो भक्ष्य बनवत आहे.तसेच त्याचा सोबत दोन बछडे देखील आहेत.वनविभागाने यावर तत्काळ उपाय योजना करावी.अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरेश झोंबाडे यांनी व्हिडिओ पोस्ट करून सांगितले आहे की तेथील नागरिकांनी
सतर्कता बाळगावी.
वन्यप्राण्यांबाबत ग्रामस्थानी घ्यावयाची दक्षता….
१. कामानिमित्त वाडी वस्ती ते शेत त्याच प्रमाणे शालेय विद्यार्थी यांचे घरापासून शाळेत जा ये करताना शक्यतो समुहाने जावे.
२. विविध जत्रा-जत्रा ऊरुस हंगाम या कालावधीत वाडी वस्ती वरुन रात्रीच्या वेळी घरी जाताना विशेष काळजी घ्यावी.
३. शेतात वाकुन काम करताना बिबट्याने पाठीमागुन हल्ला करण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ग्रामस्थांना याबाबत विशेष दक्ष रहावे.
४. बिबट्याने मनुष्य प्राण्यावर किंवा आपले पशुधनांवर हल्ला केल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ वनपरिक्षेत्र कार्यालयास द्यावी.
५. संध्याकाळच्या वेळेस राहत्या घराच्या अंगणात किंवा परिसरामध्ये लहान मुलांना एकटे सोडु नये. घडलेल्या घटनांमध्ये लहान मुले/स्त्रिया यांच्याबाबत रात्रीचे वेळेस संघर्ष झालेला आहे. तरी त्याबाबत विशेष दक्षता घ्यावी. अंगणात परिसरात विजेचा दिवा चालु ठेवावा. शक्य त्या वेळेस अंगणात शेकोटी पेटती ठेवावी.
Indrayani River : इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ; भक्ती सोपान पुलावरून पाणी
Alandi: वै. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर स्मारकाजवळील अतिक्रमण हटविणे बाबत आळंदी नगरपरिषदेस निवेदन

६. कामावर किंवा घराबाहेर जाताना लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात. आपल्या पशुधनाची रात्रीच्या वेळी गोठ्यात बांधनी करताना गोठा सर्व बाजुंनी बंदिस्त राहील त्याची दक्षता घ्यावी.
७. गुरख्यांनी आपली गुरे चरायला घेवुन जाताना जमावाने जाणे. गावापासुन दुर तसेच वनांचे खुप जवळगुरे चरायला घेऊन जावु नयेत.
८. बिबट्याचे संदर्भात प्राप्त होणाऱ्या चुकिच्या बातम्या, अफवा पसरवु नयेत व त्यांच्यापासुन दुर रहावे.
९. मोबाईल अथवा रेडीओवर गाणी चालु ठेवुन, शक्यतो घुंगराची काठी जवळ बाळगुन सहकार्याबरोबर शेतास पाणी द्यावे. रात्रीच्या वेळी हे अत्यंत आवश्यक.
१०. कधीही बिबट्याच्या पाठलाग करु नये. कारण तो घाबरुन उलटा हल्ला करु शकतो.
११. बिबट्या समोर आल्यास जोरात आरडा ओरडा करावा. खाली वाकु नये किंवा ओनवे झोपु नये.
१२. रात्री उघड्यावर झोपु नये.
१३. गावाजवळ मोकाट कुत्रे, बकऱ्या व डुकरे यांची संख्या कमी करणे आपल्याच हिताचे आहे.
१४. कोणत्याही प्रकारे बिबट्याला जखमी करु नये. जखमी बिबट्या अधिक धोकादायक बनु शकतो