Team MyPuneCity – देहूच्या नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा विभागाच्या सभापतीपदी सुधीर काळोखे, तर बांधकाम समिती सभापतीपदी आदित्य टिळेकर यांची वर्णी लागली. स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य सभापती पदी, आरोग्य व स्वच्छता सभापतीपदी पदसिध्द उपनगराध्यक्षा प्रियंका मोरे यांची निवड करण्यात आली. महिला बालकल्याण समितीच्या सभापती पदी रसिका काळोखे यांची निवड करण्यात आली. देहूनगर पंचायतीच्या विविध समित्यांच्या सभापती व सदस्य पदांची निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी(ता. ६) देहू नगरपंचायतीच्या प्रा.रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडली. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती- सभापती सुधीर काळोखे, समिती सदस्य म्हणून पूनम काळोखे, योगेश काळोखे, मयूर शिवशरण आणि योगेश परंडवाल यांची निवड करण्यात आली आहे.
बांधकाम समिती- सभापती आदित्य टिळेकर यांच्यासह सदस्यपदी ज्योती टिळेकर, योगेश परंडवाल, योगेश काळोखे आणि मयूर शिवशरण यांची निवड करण्यात आली.
Maval: मावळ, शिरुरमधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य समिती – सभापतीपदी उपनगराध्यक्षा प्रियांका मोरे यांची निवड करण्यात आली. सदस्यपदी स्मिता चव्हाण, मयूर शिवशरण, योगेश काळोखे आणि योगेश परंडवाल यांची निवड करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण विभाग- सभापती रसिका काळोखे तर सदस्य पदी स्मिता चव्हाण, शीतल हगवणे, ज्योती टिळेकर यांची निवड करण्यात आली.
स्थायी समितीच्या सभापती म्हणून पदस्थिध्द नगराध्यक्षा पूजा दिवटे यांची निवड करण्यात आली. स्थायी समितीचे सदस्य म्हणून प्रियांका मोरे, रसिका काळोखे, सुधीर काळोखे आणि आदित्य टिळेकर यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. या समितीच्या सभापती व सदस्य पदांच्या निवडणुकीची प्रक्रिया पीठासीन अधिकारी प्रांत अधिकारी जयवंत माने यांच्या उपस्थित सकाळी ११ वाजता सुरू झाली.
विषय समित्यांच्या संख्या व सदस्य निश्चित करणे, नामनिर्देशन सादर करणे, नामनिर्देशन केलेल्या सदस्यांची नावे जाहीर करणे, विषय समिती सभापती पदासाठी मुख्याधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन पत्र सादर करणे, नामनिर्देशन पत्रांची छाननी करणे, नामनिर्देशन पत्र माघारी घेणे ही प्रक्रिया सकाळी ११ :१५ ते दुपारी २ :३० या वेळेत पार पडली. त्यानंतर पीठासीन अधिकारी यांनी विषय समितीच्या सभापती व सदस्यांची नावे जाहीर केली. प्रांत अधिकारी डॉ. जयवंत माने, देहूनगर पंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे, कार्यालयीन अधिक्षक प्रियांका कदम, रामदास भांगे, महेश वाळके यांच्या उपस्थित ही निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी पार पडली.