Team MyPuneCity –पिंपरी येथे विजेच्या धक्क्याने चार श्वानांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी आणखी एक घटना घडली. देहूरोड येथे विजेच्या धक्क्याने पाच शेळ्यांचा मृत्यू झाला आहे.
देहूरोड परिसरात मंगळवारी (२० मे) सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसात विजेच्या उघड्या तारांमुळे पाच शेळ्यांचा मृत्यू झाला. ही घटना शहरातील इलेक्ट्रिक डीपीजवळ घडली. उघड्या ठेवलेल्या विद्युत तारांमध्ये वीजप्रवाह सुरू असताना शेळ्या गवत खाण्यासाठी त्या ठिकाणी गेल्या आणि त्यांना विजेचा धक्का बसला. या घटनेत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
Chakan:पत्नीवरील संशयातून मध्यप्रदेशातील व्यक्तीचा खून; चाकणमध्ये गुन्हा दाखल
स्थानिक नागरिकांनी विद्युत विभागाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी संबंधित विभागाकडून नुकसानभरपाईची मागणी केली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.