Team MyPuneCity – देहूगाव जवळ इंद्रायणी नदीत (Dehu Mishap) तेरा वर्षीय मुलगा बुडाला. सहकाऱ्यांसोबत नदीमध्ये पोहण्यासाठी आला असता पोहण्याचा आनंद घेत असताना मुलगा बुडाला. ही घटना शुक्रवारी (16) दुपारी बोडकेवाडी येथे घडली.
तरुण विष्णू गुप्ता (13, देहूरोड) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे.
Pimpri Chinchwad: अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांची बदली
याबाबत माहिती अशी की, तरुण गुप्ता (Dehu Mishap) त्याच्या सहकाऱ्यांसोबत देहूगाव जवळ बोडकेवाडी येथे इंद्रायणी नदी मध्ये पोहण्यासाठी गेला होता. तरुण हा त्याच्या सहा सहकाऱ्यांसोबत नदीत पोहण्यासाठी उतरला. पोहण्याचा आनंद घेत असताना अचानक त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. मुलगा पाण्यात बुडतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अनिल आंद्रे, गणेश गायकवाड, भास्कर माळी, अनिश गराडे, कुंदन भोसले, गणेश सोंडेकर, निलेश गराडे यांनी तरुण गुप्ता याचा मृतदेह बाहेर काढला.
राज्यातील 14 पोलीस अधीक्षकांना प्रमोशन; मोक्षदा पाटील, पुण्याच्या पंकज देशमुखांनाही पदोन्नती