Team MyPuneCity –जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान १८ जून रोजी दुपारी श्री क्षेत्र देहूगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले ( Dehu) जाणार आहे. या पार्श्वभूमीवर देहूनगर पंचायत व श्री संत तुकाराम महाराज संस्थान यांची पालखी प्रस्थान सोहळ्याच्या तयारी बाबत यंसुक्त आढावा बैठक गुरुवारी दुपारी देहूनगर पंचायतीच्या सभागृहात पार पडली.
या बैठकीत पालखी प्रस्थान सोहळ्या निमित्त येणाऱ्या दिंड्या, वारकरी, भाविक भक्त यांना कोणत्याही प्रकरच्या समस्या येऊ नयेत यासाठी देहूनगर पंचायतीने काय तयारी केली आहे. पालखी सोहळ्यासाठी संस्थानच्या सुचना नुसार काही तयारी करणे आवश्य़क असेल तर तयारी करण्यासाठी ही संयुक्त बैठक आयोजित केली हाती. यामध्ये नगरपंचायत प्रशासनाने काय तयारी केली आहे याबाबतची माहिती देण्यात आली.
भारत पाक यांच्यात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पालखी सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी करडी नजर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेंरे बसवण्यात येणार आहेत. मोक्याच्या ठिकणी टेहळणी मनोरे उभे करण्यात येणार आहेत. त्याच प्रमाणे पोलीसांच्या मदतीने व त्यांच्या सुचने प्रमाणे योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. पाणी पुरवठा विभाग- यात्रा काळात भाविकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागु नये यासाठी ( Dehu) पाण्याचे टँकर नळ तोट्या सहित उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
इंद्रायणी नदी पात्रात पाणी सोडण्याबाबत पाठबंधारे विभागाशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. देहूतील सर्व आर. ओ. फिल्टर प्लॅट धारकांनी पाणी तपासणी करून घेणे बाबत या विभागाकडून पत्रव्यहार करण्यात आला आहे. स्वच्छ व शुध्द पाणी पुरवठा या संदर्भात अनुषंगिक कामांसाठी देहू प्राथमिक केंद्रास देखील पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
Pimpri : ‘स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःची काळजी घ्या!’ – डाॅ. दत्ता कोहिनकर
विद्युत विभाग
विद्यूत विभागाच्या वतीने नदी घाटावरील सर्व हायमस्क दुरुस्त करून चालू करणे. मंदिर परिसर, वैकुंठ मंदिर व परिसर मुख्य कमान, देहू शहरातील सर्व रस्ते व विविध दिंड्याच्या ठिकाणी विद्युत पुरवठा व्यवस्थित होईल याची दक्षता घेणे. महावितरणच्या उघड्यावर असलेल्या डीपी व तारा संबधी सुरक्षितता व यात्रा काळात अखंड विद्यूत पुरवठा ठेवण्यासंदर्भात पत्रव्यवहार ( Dehu) करण्यात आला आहे.
आरोग्य विभाग
आरोग्य विभागाच्या वतीने मंदिर परिसर साफसफाई करणे व पाच कर्मचारी पाच दिवसा करीता साफ सफाई कर्मचारी उपलब्ध करून देणे, इंद्रायणी नदी मधील जल पर्णी काढणे हे काम प्रगती पथावर आहे. दोन दिवसासाठी जीवरक्षक अर्थात पोहता येणारी माणसे ठेवणे, नगरपालिके कडून अग्निशमन बंब देणे बाबत मागणी पत्र देणे, वैकुंठगमन मंदिर परिसराची साफसफाई करणे, धूर फवारणी करणे, मुख्य कमान ते काळोखे चौक, मुख्य कमान ते राम कृष्ण मंगल कार्यालय पर्यंत साफसफाई, फिरत्या शौचालयाची व्यवस्था करणे, तसेच आणि या काळात मांस-मासे विक्री बंद ठेवणे ( Dehu) अशी कामे या विभागावर सोपवण्यात आली आहेत.
बांधकाम विभाग
देहूनगर पंचायत हद्दीत आवश्यकतेनुसार बॅरिकेट लावणे, रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवणे, ठिकठिकाणी दिशादर्शक फलक बसवणे, पोलिस खात्याशी संपर्क करून आवश्यक ती कामे करून घेणे, पीएमपीएल व एसटी आगार व्यवस्थापक यांना पत्र देणे ही कामे बांधकाम विभाग ( Dehu) करणार आहे.
अतिक्रमण विभाग
या विभागा मार्फत अनगडशहा बाबा दर्गा ते देहूगाव मुख्य कमान देहूगाव चौदा टाळकरी कमान ते भक्ती शक्ती निवास या दरम्यान असलेली सर्व अतिक्रमण धारक यांना नोटीस बजावणे व अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत.
पाण्याचे टँकर उभारण्याचे ठिकाण
भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी यात्रा काळात राधाकृष्ण मंगल कार्यालय, अनगडशहा बाबा दर्गा, तळवडे हॉस्पिटल, विठ्ठल मंदिर, मुख्य प्रवेशद्वार कमान, चौदा टाळकरी कमान, भक्त निवास समोर, भैरवनाथ चौक, गाथा मंदिर, गायराना जवळील शौचालय, प्राथमिक आरोग्य केंद्रा समोर आणि जुन्या ग्रामपंचायत कार्यालया जवळ आदी ठिकाणी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात येणार असून आवश्यकतेनुसार यात वाढ केली जाणार ( Dehu) आहे.
फिरती शौचालये उभारण्याची ठिकाणे
श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने जिल्हा परिषदे कडून एक हजार फिरती शौचालय उपलब्ध होणार असून, विठ्ठल मंदिर विठ्ठलवाडी, सिद्धेश्वर मंदिर, गाथा मंदिर, चव्हाणनगर रोड मैदान, भैरवनाथ चौक, मुख्य घाट, आणि मुख्य कमान दरम्यान आदी ठिकाणी ही शौचालय उभे करण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.
देहूनगर पंचायतीच्या अध्यक्षा पूजा दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. या बैठकीस देहूनगर पंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, कार्यालयीन अधीक्षक प्रियांका कदम, उपनगराध्यक्ष मयूर शिवशरण, नगरसेवक योगेश परंडवाल, प्रवीण काळोखे, नगरसेविका पूनम काळोखे, स्मिता चव्हाण, सपना मोरे, तसेच देहू देवस्थान संस्थाचे विश्ववस्त दिलीप महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, विक्रमसिंह महाराज मोरे, देहूनगर पंचायतीचे सर्व अधिकारी उपस्थित ( Dehu) होते.