situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Dehu ATM News : गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडणारी हरियाणाची टोळी देहूरोडमध्ये रंगेहाथ पकडली

Published On:
Dehu ATM News

Team MyPuneCity – देहूरोडमध्ये एटीएम फोडण्याचा (Dehu ATM News) प्रयत्न करत असलेली हरियाणातील टोळी पोलीसांनी रंगेहाथ पकडली. यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, इतर तीन जण घटनास्थळावरून पळून गेले आहेत. ही कारवाई देहू आळंदी रोडवरील इंडसइंड बँकेच्या एटीएमजवळ रात्री दीडच्या सुमारास करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मुस्तफा मोबीन खान (३०) आणि मुस्तकीम मोबीन खान (२५), राहणार पिनागव्वान, जिल्हा नुह, हरियाणा अशी आहेत. त्यांच्या तीन साथीदारांमध्ये एक महिला सिमा युसूफ खान, वारीस खान आणि आझाद खान यांचा समावेश असून ते कारमधून पळून गेले. या टोळीचा प्रमुख युसूफ खान असल्याचे निष्पन्न झाले (Dehu ATM News) आहे.

Alandi : आळंदीत भव्य रक्तदान व मोफत आरोग्य शिबिर संपन्न

गेल्या दोन महिन्यांपूर्वी विठ्ठलवाडी, देहूगाव येथील एसबीआय एटीएम फोडून तब्बल १६ लाख रुपयांची चोरी करण्यात आली होती. त्यामुळे एटीएम सुरक्षिततेसाठी देहूरोड पोलीस ठाणे हद्दीत रात्रगस्त वाढवण्यात आली होती. 26 मे रोजी रात्री देहू आळंदी रोडवरील इंडसइंड बँकेच्या एटीएमजवळ एक संशयास्पद पांढऱ्या रंगाची कार उभी असल्याचे बिट मार्शलवरील पोलीस शिपाई समाधान पटावकर आणि किरण पाटील यांच्या निदर्शनास आले.

कारमधील व्यक्तींनी पोलीस पाहताच वेगाने गाडी पळवली. त्यानंतर पोलीसांनी एटीएमकडे धाव घेतली असता, शटर अर्धवट उचकटलेले दिसले आणि आतमधून आवाज येत असल्याने त्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक जोएब शेख यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि एटीएममध्ये दोन व्यक्ती गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडत असल्याचे आढळले. पोलीसांना पाहताच आरोपींनी आरडा-ओरड, शिवीगाळ करत दगडफेक केली, परंतु पोलीसांनी प्रसंगावधान राखत दोघांना ताब्यात (Dehu ATM News) घेतले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जोएब शेख, पोलीस शिपाई समाधान पटावकर, किरण पाटील आणि सोपान वालेकर यांच्या पथकाने केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जोएब शेख करीत (Dehu ATM News) आहेत.

Follow Us On