Team MyPuneCity – देहू येथे इंडसइंड बँकेचे एटीएम (Dehu ATM News) फोडण्याचा प्रकार मंगळवारी (27 मे) पहाटे उघडकीस आला. एटीएम फोडणाऱ्या आरोपींना देहूरोड पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोघांना पकडण्यात यश आले आहे. तर तिघेजण पळून गेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, देहू आळंदी रोडवर इंडसइंड बँकेचे एटीएम (Dehu ATM News) सेंटर आहे. या एटीएम सेंटरमध्ये मंगळवारी पहाटे पाच जण चोरी करण्याच्या उद्देशाने आले. आरोपींनी गॅस कटरच्या साह्याने एटीएम कापण्याचा प्रयत्न केला.
सिंहगड रोडवरील वडगावमध्ये टोळक्याने भाईगिरी करीत 22 गाड्यांची केली तोडफोड
दरम्यान हा प्रकार स्थानिक नागरिकांना समजला. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. देहूरोड पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने चोरी करणाऱ्या दोन आरोपींना पकडण्यात आले. दरम्यान तीन आरोपी कार मधून पळून गेले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.