situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Dastkari Haat Craft Bazaar : ‘दस्तकारी हाट क्राफ्ट बाजार’ : उद्यापासून कलाग्राममध्ये होणार पारंपरिक कारागिरीचा रंगतदार उत्सव

Published On:

Team My Pune City –सुप्रसिद्ध समाजसेविका जया जेटली ( Dastkari Haat Craft Bazaar) यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या दस्तकारी हाट समितीतर्फे आयोजित प्रतिष्ठित ‘दस्तकारी हाट क्राफ्ट बाजार’ यंदा पुन्हा एकदा पुणेकरांसाठी खुला होत आहे. पुणे महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी कार्यक्रमाच्या सहकार्याने नव्याने साकारलेल्या कलाग्राम या सांस्कृतिक केंद्रात हा बाजार भरविण्यात येणार आहे. सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ, पुणे–ओकायामा मैत्री उद्यानाच्या शेजारील कलाग्राम हे अलीकडेच पुणेकरांसाठी खुले झालेले नवे सांस्कृतिक व्यासपीठ आहे.

Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य; अंतिम तारीख १८ नोव्हेंबर


कार्यक्रमाचे वेळापत्रक

हा क्राफ्ट बाजार ३० ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दररोज सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला राहील. देशभरातील कारागीर आणि कलाकारांच्या १२० हून अधिक स्टॉल्समधून पारंपरिक कला, हस्तकला आणि वस्त्रनिर्मितीचे अप्रतिम दर्शन घडणार आहे.


उद्घाटन सोहळा
( Dastkari Haat Craft Bazaar)

उद्घाटन समारंभ ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार असून, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि त्यांची कन्या, वास्तुशिल्पी तीर्था मिसाळ यांच्या हस्ते तो पार पडेल. या वेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, तसेच दस्तकारी हाट समितीच्या अध्यक्षा जया जेटली आणि प्रकल्प प्रमुख चारू वर्मा उपस्थित राहणार आहेत.

Dehu Road Burglary : देहूरोडमध्ये घरफोडी; सोने-रोख रक्कम लंपास


सहभागी कारागीर
( Dastkari Haat Craft Bazaar)

या बाजारात महाराष्ट्रातील नामांकित कारागीर सहभागी होणार आहेत. त्यात चन्नपटणा खेळणी तयार करणाऱ्या मिनू जोशी, कांथा भरतकामात निपुण झुमकी अय्यंगर, नागपूरचे कोसा सिल्क तज्ज्ञ प्रवीण बडवे, बंजारा भरतकामातील रोहित राठोड, कोल्हापुरी चप्पल निर्मितीतील संतोष मोरे आणि घोंगडी–गोधडी निर्मितीतील नीराज बोराटे यांचा समावेश आहे.


याशिवाय उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, ओडिशा, मध्य प्रदेश आणि दिल्लीसह विविध राज्यांतील कारागीरही सहभागी होणार आहेत. यात लाकडी कोरीवकाम, पिचवाई पेंटिंग, क्रूएल भरतकाम, गोंड पेंटिंग, सबाई विणकाम, चांबा भरतकाम यांसारख्या विविध पारंपरिक कलांचा समावेश असेल.


सांस्कृतिक कार्यक्रम आणि कार्यशाळा ( Dastkari Haat Craft Bazaar)


या वर्षीच्या बाजारात ३० हून अधिक नवीन कला आणि वस्त्रप्रदर्शने पाहायला मिळतील. तसेच गोंड पेंटिंग, मधुबनी, ब्लॉक प्रिंटिंग, कालीघाट, पाम लीफ पेंटिंग आणि विणकाम यांसारख्या कौशल्य कार्यशाळा आयोजित केल्या जातील.


मनोरंजनासाठी पश्चिम बंगालचे छऊ नृत्य, राजस्थानचे मंगनियार गायक यांचे सादरीकरण होणार असून, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि जुन्या दिल्लीच्या पारंपरिक खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेता येणार आहे.


दस्तकारी हाट समितीच्या संस्थापक जया जेटली म्हणाल्या, “कलाग्राम हे आमच्या कारागिरांसाठी कायमस्वरूपी घर ठरेल. पुण्यातील हा वार्षिक उत्सव भारताच्या पारंपरिक कौशल्याचे सर्वोत्तम दर्शन घडवेल.तर तीर्था मिसाळ यांनी सांगितले, “कलाग्राम हे आपल्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. दस्तकारी हाट समिती या प्रवासाची सुरुवात करत आहे, ही आनंदाची बाब ( Dastkari Haat Craft Bazaar) आहे.

Follow Us On