श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सजावटीचा शुभारंभ सोहळा संपन्न
Team MyPuneCity – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने १३३ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त केरळ मधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभस्वामी मंदिर. हे मंदिर श्री वैष्णव परंपरेत श्री विष्णूंचे पवित्र निवासस्थान (Dagdusheth Ganpati) मानले जाणारे १०८ दिव्य देसमांपैकी म्हणजेच निवासस्थानांपैकी एक आहे. अत्यंत पवित्र असलेल्या या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे साकारण्यात येणार असून भाविकांकरीता विशेष आकर्षण ठरणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.
सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा (Dagdusheth Ganpati) शुभारंभ सोहळा कलादिग्दर्शक विनायक रासकर आणि सरिता रासकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, राजाभाऊ चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच पुण्यातील विविध मंदिरे, धार्मिक संस्था आणि गणेशोत्सव मंडळाचे विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड ते राजगुरुनगरदरम्यान दररोजचा प्रवास ठरत आहे मानसिक छळ
गेली अनेक वर्षे विविध मंदिरांची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून (Dagdusheth Ganpati) साकारण्याकरीता ट्रस्ट प्रयत्नशील आहे. यंदा ज्या पद्मनाभ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे, ते मंदिर केरळ शैली आणि द्रविड शैलीच्या वास्तुकलेचे गुंतागुंतीचे मिश्रण करून बांधले गेले आहे. पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीत ५ थरांचा गोपुर असणार आहे. त्यामध्ये कृष्णलीला, रामायण, सप्तऋषी, घोडे, हत्ती, सिंह साकारण्यात येणार आहेत. तर, गाभा-यात विष्णू लक्ष्मी, शिवपार्वती, श्रीकृष्ण आणि नृसिंह यांच्या मूर्ती असतील. मुख्य मखराच्या वरच्या बाजूस अष्टकोनी भागामध्ये भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रिस्त मूर्ती साकारण्यात येणार आहे. नानाविध वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेल्या मंदिराची प्रतिकृती सुमारे १०० फूट इतकी असेल.

पद्मनाभ स्वामी हे अनंतशयन मुद्रेत विराजमान असे भगवान विष्णूंचे एका रूप आहेत. जे शेष नावाच्या त्यांच्या नाग पर्वतावर शाश्वत योगिक निद्रेमध्ये गुंतलेले आहे. पद्मनाभस्वामी हे त्रावणकोर राजघराण्याचे पालक देवता देखील आहेत. याच पद्मनाभ स्वामी मंदिराची रचना अत्यंत विलोभनीय असून मुख्य तीर्थक्षेत्र म्हणून याची सर्वदूर ख्याती आहे. मंदिराच्या गर्भगृहात पद्मनाभ सर्प अनंत किंवा आदिशेषावर बसलेला आढळतो. या सर्पाचे पाच फणे हे आतील बाजूला तोंड करून आहेत, जे चिंतन दर्शवितात. पद्मनाभ स्वामींचा उजवा हात शिवलिंगावर ठेवला आहे. समृद्धीची देवी श्रीदेवी – लक्ष्मी आणि विष्णूंच्या पत्नी पृथ्वीची देवी भूदेवी त्याच्या बाजूला आहेत. ब्रह्मा हे या देवतेच्या (Dagdusheth Ganpati) नाभीतून बाहेर पडणा-या कमळावर अवतरतात.
पद्मनाभ स्वामींचे दर्शन तीन दरवाज्यांमधून घेता येते. पहिल्या दरवाज्यातून पद्मनाभ आणि त्याच्या हाताखाली शिवलिंगाचे रूप दिसते. दुस-या दरवाज्यातून पद्मनाभ, श्री देवी आणि भूदेवी यांच्या सोन्याच्या अभिषेक मूर्ती व पद्मनाभ स्वामींची चांदीची उत्सव मूर्ती पाहायला मिळते. तर, तिस-या दरवाज्यातून देवतेचे चरण आणि भूदेवी व मार्कंडेय मुनी यांचे दर्शन होते. अशा केरळमधील विलोभनीय पद्मनाभस्वामी मंदिराची प्रतिकृती सन २०२५ च्या गणेशोत्सवात देश-विदेशातील गणेशभक्तांना पुण्यात पाहायला मिळणार आहे.
प्रतिकृतीचा आकार १२० फूट लांब, ९० फूट रंद आणि १०० फूट उंच असणार आहे. यामध्ये ३० भव्य खांब असून ५०० देवी-दैवता, ऋषीमुनी यांच्या मूर्ती असणार आहेत. गाभारा सुवर्ण रंगाने सजलेला असून संपूर्ण छताचा भाग अष्टकोनी स्वरूपात साकारण्यात येईल. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रीं चे दर्शन घेता येईल. कलादिग्दर्शक विनायक रासकर यांनी मंदिराचे काम, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली (Dagdusheth Ganpati) आहे.