situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Cyber Crime News : सोशल मीडियावरील “गर्भधारणा नोकरी” जाहिरातीचा सापळा; कंत्राटदाराला ११ लाखांचा फटका

Published On:
Cyber ​​Crime News

Team My Pune City – सोशल मीडियावरील आकर्षक ( Cyber Crime News) जाहिरातींमुळे फसवणुकीचे नवे प्रकार समोर येत आहेत. हडपसरमध्ये राहणाऱ्या ४४ वर्षीय कंत्राटदाराला “गर्भधारणेच्या नोकरी”च्या आमिषाने तब्बल ११ लाख रुपयांचा फटका बसला आहे.


सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कंत्राटदाराला ( Cyber Crime News) फेसबुकवर एक जाहिरात दिसली. त्यात एका महिलेने लिहिले होते – “मला असा पुरुष हवा आहे जो मला आई बनवू शकेल. गर्भधारणा झाल्यास २५ लाख रुपये, गाडी आणि घरात वाटा मिळेल.” या आमिषाला बळी पडून कंत्राटदाराने संपर्क साधला.

Nilesh Ghaywal : नीलेश घायवळ टोळीचा नवा कारनामा; मित्राची कागदपत्रे वापरून सिमकार्ड गैरवापर


फोनवर स्वतःला “प्रेग्रंट जॉब्स” कंपनीचा सहाय्यक म्हणून ( Cyber Crime News) ओळख करून देणाऱ्या व्यक्तीने नोंदणी शुल्क, ओळखपत्र पडताळणी, जीएसटी, टीडीएस, प्रक्रिया शुल्क अशा विविध कारणांखाली पैसे मागितले. सप्टेंबरपासून २३ ऑक्टोबरपर्यंत कंत्राटदाराने १०० हून अधिक व्यवहार केले आणि एकूण ११ लाख रुपये UPI व IMPS द्वारे पाठवले.

Talegaon Municipal Council : तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक : प्रारूप मतदार यादीवर तब्बल १,८९१ हरकती


शेवटी जेव्हा तक्रारदाराने प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा फसवणूक करणाऱ्यांनी त्याला ब्लॉक केले. त्यानंतरच त्याला समजले की तो सायबर ( Cyber Crime News) टोळीच्या जाळ्यात अडकला आहे. या प्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सायबर सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत देशभरात ( Cyber Crime News) अशा “गर्भधारणा नोकरी”च्या बनावट जाहिरातींमध्ये वाढ झाली आहे. व्हिडिओ किंवा पोस्टद्वारे महिलांकडून मोठ्या रकमेचे आश्वासन दिले जाते आणि त्यानंतर पुरुषांकडून नोंदणी, वैद्यकीय चाचण्या किंवा कायदेशीर औपचारिकतेच्या नावाखाली पैसे उकळले जातात. पैसे मिळाल्यानंतर फसवणूक करणारे गायब होतात.


पुणे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावरील अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नये. कोणतीही संशयास्पद लिंक, कॉल किंवा ऑफर आढळल्यास त्वरित सायबर क्राइम हेल्पलाइनवर तक्रार ( Cyber Crime News) नोंदवावी.

Follow Us On