Team My Pune City – गुन्हे शाखा, युनिट-१ पुणे शहरच्या ( Crime News) पथकाने धाडसी कारवाई करत टिशु पठाण गँगमधील दोन रेकॉर्डवरील आरोपींना अवैध पिस्तुल व जिवंत काडतुसेसह अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 1 सप्टेंबर) सोमवार पेठेतील समर्थ व्यायामशाळेजवळ करण्यात आली.
गुन्हे शाखा, युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे हे युनिट ( Crime News) कार्यालयात कारवाई संदर्भात मार्गदर्शन करत असताना पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे व पोलीस अंमलदार अनिकेत बाबर यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, टिशु पठाण गँगमधील दोन रेकॉर्डवरील गुन्हेगार तालीम खान आणि युनुस खान हे समर्थ व्यायामशाळा परिसरात अवैध शस्त्रांसह फिरत आहेत. ते गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक घाडगे यांनी पथकास तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
Talegaon MIDC Road : तळेगाव एमआयडीसीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी ४१ कोटींच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात
त्यानुसार पंचांच्या उपस्थितीत पथकाने ठिकाणी जाऊन सापळा रचला. या वेळी १) तालीम आस मोहम्मद खान उर्फ आरिफ (२४, रा. कुंजीरवाडी चौक, लोणीकाळभोर) व २) युनुस जलील खान (२४, रा. सय्यदनगर, हडपसर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची अंगझडती घेतली असता तालीम खानकडून ४० हजार रुपये किंमतीची गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे (किंमत २ हजार रुपये) जप्त करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस अंमलदार अनिकेत बाबर यांच्या फिर्यादीवरून समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे( Crime News) करत आहेत.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ निरीक्षक कुमार घाडगे (युनिट-१), अंजुम बागवान (युनिट-२), राहुलकुमार खिलारे (भारती विद्यापीठ पो.ठा.), सहा.निरीक्षक आशिष कवठेकर, दीपक बर्गे, तसेच पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे, निलेश मोकाशी, संजय आंदलिग व अंमलदार विनोद शिंदे, विठ्ठल साळुंखे, अनिकेत बाबर, निलेश जाधव, शशिकांत दरेकर, सिद्धेश्वर वाघमारे, मयुर भोसले, अभिनव लडकत, ओंकार कुंभार, संभाजी सकटे, हेमंत पेरणे, अमित जमदाडे, निलेश साबळे, उमेश मठपती, शुभम देसाई, सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभि चौधरी आदींनी सहभाग ( Crime News) घेतला.