situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Crime News : एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांची पर्स चोरी करणाऱ्या तिघी महिला चोरट्या जेरबंद

Published On:
Tulshibag Theft,

Team My Pune City – एसटी व पीएमटी बसमधील ( Crime News) गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे पाकीट व पर्स चोरणाऱ्या तीन सराईत महिला चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट-4, पुणे शहरच्या पथकाने अटक केली आहे. या महिलांकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण 4 लाख 12 हजार 234  रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आशा देविदास लोंढे (वय 60, रा. रेल्वे स्टेशन शेजारी, लोणी काळभोर, पुणे), रेखा मनोहर हातागळे (वय 35, रा. सदर, पुणे), हेमा दिगंबर हातागळे (वय 41 रा. सदर, पुणे) अशी अटक आरोपी महिलांची नावे आहेत.

Sharad Ponkshe: सद्य परिस्थितीत भाजपशिवाय देशाला पर्याय नाही,द्या किती शिव्या द्यायच्यात त्या…” -शरद पोंक्षे

खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत युनिट-4 चे पोलिस अंमलदार प्रविण राजपुत आणि संजय आढारी हे गस्तीदरम्यान पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की वाकडेवाडी पीएमटी बसस्थानकाजवळ तीन महिला बसमध्ये प्रवाशांचे पाकीट व पर्स चोरी करण्यासाठी थांबल्या आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे युनिट-4 च्या पथकाने तात्काळ वाकडेवाडी येथे धाव घेत या तिघींना ताब्यात( Crime News) घेतले.

Maval Crime News : मावळातील सुदवडी येथे हातभट्टी दारू निर्मितीचा पर्दाफाश

सखोल चौकशीत त्यांनी कबुल केले की, नाशिक ते इस्लामपूर या एसटी प्रवासादरम्यान मोरेबाग बसस्थानक ते मांडेवाडी दरम्यान एका महिला प्रवाशाची पर्स चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून रोकड 1000 आणि सोन्याचे दागिने मिळून एकूण 4 लाख 12 हजार 234  किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिसांकडे सुरू( Crime News) आहे.

सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, उप-आयुक्त (गुन्हे)  निखिल पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-1) विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, अंमलदार प्रविण राजपुत, हरीष मोरे, एकनाथ जोशी, संजय आढारी, प्रविण भालचिम, विठ्ठल वाव्हळ, भरत गुंडवाड आणि मयुरी नलावडे यांनी ( Crime News) केली.

Follow Us On