Team MyPuneCity – पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत ( Crime News) मे महिन्यात अंमली पदार्थ विरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाया करत तब्बल ७८ लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. पोलिस महासंचालक यांच्या आदेशानुसार आणि पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली १ मे ते ३१ मे २०२५ दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. या काळात पोलिसांनी एकूण ७२ कारवाया करत १३५ किलो गांजा, ५२१ ग्रॅम अफू आणि ९५ ग्रॅम एम.डी. जप्त केले असून ८३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Mahavitran : साडेपाच हजारांवर कर्मचाऱ्यांकडून एकाचवेळी विद्युत सुरक्षेची शपथ
गुन्हे शाखेच्या पथकांनी केलेल्या विशेष कारवायांमध्ये पिंपरी, चाकण, दिघी, म्हाळुंगे एमआयडीसी आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गांजाची झाडे, प्रक्रिया केलेला गांजा आणि एम.डी. मिळून आले. चाकण येथे सलमान सय्यद आणि सनी शहा यांच्या ताब्यातून ११ किलो ( Crime News) गांजा जप्त करण्यात आला. तर दिघी परिसरात किशोर चक्कर आणि संतोष दाभाडे यांच्या ताब्यातून १३ किलो गांजा सापडला. पिंपरीत सनी माचरेकर याच्याकडून ५ किलो गांजा आणि चाकण परिसरात कुमार मोहीते याच्याकडून १५ किलो गांजा जप्त करण्यात आला. तसेच म्हाळुंगे एमआयडीसीमध्ये बाळु गावळ याच्या शेतात गांजाची २८ किलो वजनाची झाडे सापडली.
हिंजवडी परिसरात अक्षय देडे आणि राहुल देवरे यांच्या ताब्यातून ६८ ग्रॅम एम.डी. तर दिघीमध्ये समीर खान याच्याकडून ११ ग्रॅम एम.डी. जप्त करण्यात आला. या मोहिमेमुळे अंमली पदार्थांच्या विक्री व साठवणुकीला जोरदार धक्का बसला ( Crime News) आहे.