Team My Pune City – ऑनलाइन गेमच्या ( Crime News ) आहारी गेलेल्या एका शाळकरी मुलाला ‘गेमिंग आयडी’ देण्याचे आमिष दाखवून साडेतीन लाख रुपयांचे दागिने लंपास करणाऱ्या दोघांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे.
Dagdusheth Ganpati : कार्तिक शुद्ध चतुर्थी निमित्त दगडूशेठ गणपतीला ११०० श्रीफळांचा महानैवेद्य( Crime News ) Dagdusheth Ganpati : कार्तिक शुद्ध चतुर्थी निमित्त दगडूशेठ गणपतीला ११०० श्रीफळांचा महानैवेद्य
परभणी येथील मयूर उर्फ शशिकांत मुंजाजी भिसाड (२१) आणि किशोर डहाळे (२२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ( Crime News ) होती.
Maval: पवना कृषक सेवा सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षपदी बाळू आखाडे यांची निवड
नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा परिसरातील हा मुलगा ऑनलाइन गेममध्ये गुंतला होता. समाजमाध्यमांद्वारे त्याची ओळख भिसाड याच्याशी झाली. त्याने ‘गेमिंग आयडी’ देण्याचे आमिष दाखवून मुलाला घरातून पाच तोळे सोन्याचे दागिने आणण्यास प्रवृत्त केले. मुलाने दागिने आरोपीकडे दिल्यानंतर ते त्याने साथीदार डहाळेला परभणीत सुपूर्द ( Crime News ) केले.
फिर्यादीनंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. तपासात मुलगा आणि आरोपी यांच्यातील संवाद उघडकीस आला. त्यानंतर भिसाडला अटक करून त्याच्याकडून एक लाख ६२ हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले.ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शिक्रापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपरत्न गायकवाड, सहायक निरीक्षक राहुल देशमुख, विनायक मोहिते आणि प्रताप कांबळे यांनी या कारवाईत (Crime News ) सहभाग घेतला.




















