Team MyPuneCity – हडपसर पोलीस स्टेशनच्या गुन्हे तपास पथकाने तिन्ही विधिसंघर्षित बालकांकडून घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आणले असून त्यांच्याकडून तब्बल दोन लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही कामगिरी २ जून २०२५ रोजी हडपसर पोलीस पथकाने हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान ( Crime News) केली.
पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड आणि त्यांच्या पथकाने गस्त घालत असताना, तीन विधिसंघर्षित बालके संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेळोवेळी घरफोड्या केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून खालील चार गुन्ह्यांचा तपास उघडकीस आला:
- हडपसर पोलीस ठाण्यातील गुन्हा – ५०२/२०२५
- गुन्हा – ५०८/२०२५
- गुन्हा – ४४०/२०२५
- गुन्हा – ४९१/२०२५
या चौघांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सुमारे २ लाख रुपये किमतीचे २ किलो ५०० ग्रॅम वजनाचे विविध प्रकारचे चांदीचे दागिने जप्त केले आहेत. संबंधित बालकांविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली ( Crime News) आहे.
या कारवाईसाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शन लाभले.
ही उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नीलेश जगदाळे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड व पोलीस कर्मचारी अविनाश गोसावी, दीपक कांबळे, अमित साखरे, निलेश किरवे, बापू लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महावीर लोंढे, लखन दांडगे, सागर कुंभार यांनी ( Crime News) केली.






















