Team MyPuneCity – पूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून दोन जणांनी पिता-पुत्राला कोयत्याने मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि. ६) रात्री अकरा वाजताच्या सुमारास साईनगर, मामुर्डी येथे ( Crime News ) घडली.
हरिश गणेश नायड (वय ४०, रा. साईनगर, मामुर्डी) यांनी याबाबत बुधवारी (दि. ७) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी किरण शरद हिवाळे (वय २८, रा. आकुर्डी) व सुमित शरद हिवाळे (वय ३०, रा. मामुर्डी) या दोघांना अटक केली आहे.
Pimpri : बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यात ५ मे रोजी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी यांना मंगळवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास साईनगर, मामुर्डी येथे शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांच्या मामुर्डी येथील घराजवळ फिर्यादी व त्यांच्या वडिलांच्या अंगावर रिक्षा चढवण्याचा प्रयत्न ( Crime News ) केला.
Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगर परिषदेत मॉक ड्रिल
त्यानंतर फिर्यादी हे खाली पडले असता आरोपींनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण व कोयत्याने वार करून जीवे मारण्याच्या प्रयत्न केला. त्यानंतर फिर्यादीच्या इको गाडीचे नुकसान करण्यात आले. देहूरोड पोलीस याबाबत अधिक तपास करीत ( Crime News ) आहेत.