Team MyPuneCity – मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत मित्राला लघुशंका करू नको म्हटल्याने एका तरुणावर चाकूने वार करत खून (Crime News) करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (२ जून) रात्री म्हेत्रे वस्ती, चिखली येथे घडली.
विशाल गुरप्पा पाटील (३१, चिखली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार यश विनोद कपाट (चिखली) आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Threatening for arrest : मनी लॉन्डरिंगच्या गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवून ३२ लाखांची फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल हे त्यांचा मित्र गोपाळ सुरडकर याच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये गेले होते. तिथे यश कपाट हा हॉल मध्ये लघुशंका करत होता. त्याला टॉयलेटमध्ये जाऊन लघुशंका करण्यास विशाल यांनी सांगितले.
त्या रागातून यश याने विशाल यांना धमकी दिली. त्यानंतर विशाल यांचा मित्र सागर दुधाळ याने विशाल यांना म्हेत्रेवस्ती चिखली येथे बोलावून घेतले. तिथे थांबलेल्या यश आणि त्याच्या दोन साथीदारांनी विशाल यांच्यावर चाकूने वार करत हल्ला केला. सागर याने चाकू हिसकावून घेतला असता यश याने लाकडाने मारून विशाल यांना ठार मारण्याचा (Crime News) प्रयत्न केला.